चित्रस्मृतीयशराजची यशस्वी पन्नाशी आणि पुढे....
चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत/इतिहासात 'चित्रपट निर्मिती संस्था ' महत्वाचा घटक. फाळके फिल्म ते अगदी आजच्या धर्मा प्राॅडक्सन्सपर्यंत अनेक निर्मिती संस्थाचा महत्वाचा सहभाग आहे. हिंदी चित्रपटावर फोकस टाकताना सांगायचे तर, अगदी सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म, न्यू थिएटर्स, बाॅम्बे टाॅकीज यांनी विलक्षण ठसा उमटवला. राजकमल, आर. के. फिल्म, बिमल रॉय प्राॅडक्सन्स, नवकेतन, बी. आर. फिल्म, गुरुदत्त फिल्म..... एक मोठाच प्रवास सुरु आहे. कालांतराने अशा निर्मिती संस्थाची संख्या कमी झाली, स्वतंत्रपणे निर्मिती करणारे निर्माते वाढले वगैरे वगैरेया बदलत्या काळामध्ये एका निर्मिती संस्थेची नवीन माध्यमांसह बदलत वाटचाल सुरु आहे. ती म्हणजे यशराज फिल्म! त्याचे पन्नासावे वर्ष सुरु आहे....आपले ज्येष्ठ बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरखाली 'धूल का फूल ' ( १९५९) पासून आपल्या दिग्दर्शन वाटचालीला सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी 'धरमपुत्र ' ( ६१) नंतर 'वक्त ' ( ६७) या मल्टी स्टार कास्ट चित्रपटानंतर गीतविरहित 'इत्तेफाक ' ( ६९) आणि 'आदमी और इन्सान ' ( ६९) या चित्रपटानंतर निर्माता म्हणून स्वतंत्रपणे उभे राह्यचा निर्णय घेतला तेव्हा चित्रपती व्ही शांताराम यांनी आपल्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत यशराज फिल्मच्या कार्यालयासाठी जागा दिली. १९७० ची ही गोष्ट! पहिलाच चित्रपट 'दाग ' ( रिलीज ७३) चा दिलीपकुमारच्या शुभ हस्ते मुहूर्त केला. ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-09-30 21:39:44

वाचण्यासारखे अजून काही ...

लता मंगेशकर - उत्तरार्ध
शांताराम खळे | 17 तासांपूर्वी
'एकाच रागात गाण्याचा कटाक्ष दिसत नाहीं तुम्हा मंडळींचा लताबाई !'
लता मंगेशकर - पूर्वार्ध
शांताराम खळे | 4 दिवसांपूर्वी
माझे नेहमीचे वाद्यवादक असल्याविना मी कधीं गात नाहीं
कथा : आयुष्याचा हिशोब
व. पु. काळे | 5 दिवसांपूर्वी
एक वृद्ध माणूस दुसऱ्या वृद्धाला आधार देत होता. दोन वेलींनी एकमेकांच्या आधाराने उंच होऊं असं म्हणण्यासारखंच होतं ते!
म. गांधी समाजवादी होते काय ?
राम जोशी | 5 दिवसांपूर्वी
सत्याग्रही तत्त्वज्ञान आदर्शवादी आहे तर समाजवादी तत्त्वज्ञान वास्तववादी आहे.
Mannishalohokare
5 वर्षांपूर्वी👌👍🙏