सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी तरुण चित्रपट रसिकांवर मोहिनी घातली आहे . नारायण अंधारे यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा घेतलेला आस्वाद...सत्यजित राय यांची ओळख शाळेत असताना सामान्य ज्ञानाच्या प्रश्नामुळे झाली. ऑस्कर पुरस्कार मिळवलेले एकमेव भारतीय दिग्दर्शक कोण ? असा तो प्रश्न होता. त्यांचा सिनेमा कोणता ? हा दुसरा प्रश्न. याचं पथेर पांचाली हे उत्तर पाठ झालं होतं. हा पुरस्कार पथेर पांचालीसाठी मिळाला नसून त्यांचा जीवनगौरव करण्यासाठी त्यांना ऑनररी ऑस्कर मिळालाय हे मात्र माहीत नव्हतं.पथेर पांचाली म्हणजे एखाद्या दगडाची गोष्ट असावी असा अंदाज तेव्हा केला होता. दूरदर्शनवर जेव्हा पाहण्यात आला तेव्हा हे काहीतरी वेगळंच आणि बोअरिंग आहे असं वाटलं होतं. याच दरम्यान शतरंज के खिलाडीही पाहण्यात आला होता. तोही भयंकर बोअर निघाला. तो काळ बॉलिवूडचे मसालापट पाहण्याचा होता. दर शुक्रवारी रिलीज होणारा हिंदी सिनेमा आमच्यासाठी सिनेमाविश्व होतं.कधीतरी हॉलीवूडचे व्यावसायिक सिनेमे पाहणं हाच काय तो बदल. रिजनल सिनेमा काय, वर्ल्ड सिनेमा काय असतं हे तेव्हा गावीही नव्हतं. यामुळे पथेर पांचाली आणिशतरंज के खिलाडी हे दोन्ही सिनेमे दुर्लक्षिले गेले. 2011 च्या सुरुवातीला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पाहण्यात आल्यानंतर माझ्यासाठी वर्ल्ड सिनेमा आणि रिजनल सिनेमाची दारं उघडली. त्यानंतर पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील चकरा वाढल्या. याच दरम्यान सत्यजित राय यांच्या सिनेमाची नव्याने ओळख झाली. त्यांच्या ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
समृद्ध होण्याचा काळ
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-10-04 23:36:49

वाचण्यासारखे अजून काही ...

संपादकांस पत्र
जयवंत दळवी | 4 दिवसांपूर्वी
हंसण्याची क्रिया ही तशी खालच्या पातळीचीच मानली जाते.
थोरले बाजीराव पेशवे यांनी कोकणात बजावलेली कामगिरी
अज्ञात | 7 दिवसांपूर्वी
दर्यामधें एक घडा पाणी घातलियानें दर्याची तरकी (भर) होते ऐसे नाहीं.
घोडे पेंड कुठे खाते
शं. वा. किर्लोस्कर | 2 आठवड्या पूर्वी
चार वर्षांपूर्वी घरोघर झालेले चरखे आज कोठें आहेत?
महादेव गोविंद रानडे
अज्ञात | 2 आठवड्या पूर्वी
आणि एखाद्या योग्याप्रमाणे आपला देह ठेवला