चित्रस्मृती'अलग अलग 'चा मुहूर्त आणि नात्याचे कोडेआजच्या एकविसाव्या शतकातील दुसरे दशक संपत असताना संसार न मोडता वेगळे राहणे आणि घटस्फ़ोट घेऊनही मैत्री जपणे असे नाते जपणारे/असणारे अनेक सापडतात. तीदेखील फॅशन आहे. त्यांना ते कसे बरे जमते या प्रश्नाचा आपणही फार त्रास करुन घेत नाही. तीस पस्तीस वर्षांपूर्वी मात्र सामाजिक जीवनात ही दुर्मिळ आणि धक्कादायक गोष्ट होती, तरी सिनेमाच्या जगाने ती स्वीकारली होती आणि हिंदी चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टीगच्या वेळी त्याचा 'ऑखो देखा हाल 'च्या वेळेस अनुभवला येई. खरं तर तेही पाह्यचे माझ्या मध्यमवर्गीय संस्कार, सवय यांनी स्वीकारले होते.'अलग अलग ' ( १९८५) या चित्रपटाचा मुहूर्त असाच एक चांगला अनुभव देणारा.'बाॅबी ' ( १९७३)नंतर बरोबर बारा वर्षानी डिंपल कपाडियाने याच १९८५ साली 'सागर 'व्दारे पुनरागमन केले, ते करण्यापूर्वी तिने 'मै मयके चली जाऊंगी ' हा हट्ट पूर्ण केला. आपला सुपर स्टार पती राजेश खन्नाच्या आशीर्वाद बंगल्यातून तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वीच ती आपल्या दोन्ही मुलींसह म्हणजे ट्विंकल आणि रिंकीसह बाहेर पडून आपल्या माहेरी म्हणजे जुहू चौपाटीलगतच्या समुद्र महल बंगल्यावर राह्यला गेलेली. त्या काळात ग्लाॅसी पेपर्सवरील गाॅसिप्स मॅगझिनपासून ते न्यूज प्रिन्टवरील भाषिक साप्ताहिकातून इतके आणि असे रंगतदार/चटकदार ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-10-07 20:42:42

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’