सत्यजित रे यांच्या मिश्कील चष्म्यातून दिसणारं अंधारयुग


 'शतरंज के खिलाडी ' हा चित्रपट रे यांच्या एकूण फिल्मोग्राफीमध्ये खूप वेगळा आणि त्यामुळे विशेष नोंद घेण्यासारखा सिनेमा आहे , त्याबद्दल लिहित आहेत अमोल उदगीरकर ....
सत्यजित रे यांच्या मिश्कील चष्म्यातून दिसणारं अंधारयुग
मानवाने खेळाचा शोध हा वेळ घालवण्याच्या गरजेतून लावला असावा .पण मनुष्य जमात उत्क्रांतीच्या पायऱ्या झपाट्याने चढू लागली ,तसं तसं मनोरंजनाचा आणि वेळ घालवण्याचा एक प्रकार इतकंच खेळाचं महत्त्व राहिलं नाही. खेळ हा देश ,धर्म ,आणि इतर समूहांच्या अस्मितेचं प्रतीक बनू लागला आणि खेळाच्या 'खेळाचे ' नियमच बदलून गेले. खेळ हे देशाच्या किंवा समूहाच्या मनःस्थितीचं एकक बनले .खेळामधली हार -जीत जीवनमरणापेक्षा आणि देशासमोरच्या ज्वलंत आणि धगधगत्या प्रश्नांपेक्षा मोठी बनू लागली आणि त्यातून वेगळेच प्रश्न उभे राहू लागले.
एका फुटबॉल सामन्यातल्या पराभवामुळे होंडुरास आणि अल साल्वाडोर या दोन देशांमध्ये युद्ध पेटलं होत . बोरीस स्पास्की आणि बॉबी फिशर यांच्यातला अजरामर बुद्धिबळाचा सामना विसरलात का ? हा फक्त दोन महान बुद्धिबळपटूंमधला सामना नव्हता .त्याला दोन महासत्तांमधल्या शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती .स्पास्की आणि फिशरमधला सामना हा एकप्रकारे तत्कालीन सोवियत युनियन आणि अमेरिका यांच्यातल्या शीतयुद्धाचा एक महत्त्वाचा भाग होता .फार लांब कशाला जायचं ? भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा क्रिकेट सामन्यात एकमेकांना भिडतात तेव्हा दोन्ही देशातले कोट्यवधी लोक सगळ्या समस्या , कामं तात्पुरतं बाजूला ठेवून टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसतातच की . त्या अर्थाने तुमचा देश कुठल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. jrpatankar

      10 महिन्यांपूर्वी

    खर आहे. महान दिग्दर्शक.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen