नामवंत लेखकांचे वास्तव रुपवाणी, चंदेरी, रसरंग अशी अनेक नियतकालिके आणि इतरत्र आजवर प्रसिद्ध झालेल्या लेखांपैकी निवडक दर्जेदार लेख इथे दर गुरुवारी पुनः प्रकाशित करण्यात येतील. हा पहिला लेख. अब्बास किअरोस्तामी हा इराणीयन चित्रपट दिग्दर्शक एकाच वेळी लेखक,कवी, चित्रकार, छायाचित्रकार, ग्राफिक डिझायनर, निर्माता अशा अनेक भूमिकांमध्ये वावरत होता. चाळीसहून अधिक चित्रपट आणि डॉक्युमेंट्रिज करताना त्याने वास्तववादी चित्रपटांची स्वतःची एक शैली विकसित केली. लहान मुलांच्या व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या कथा आणि वृत्तचित्र धाटणीची हाताळणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. किअरोस्तामी यांचे वयाच्या ७६व्या वर्षी ४ जुलै २०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या चित्रपटांमधील मर्म उलगडून दाखवणारा गणेश मतकरी यांचा हा लेख. किअरोस्तामी आणि त्याचं वास्तव ' फिल्म बिगिन्स विथ डि डि डब्ल्यू ग्रिफिथ अँन्ड एन्ड्स विथ अब्बास किअरोस्तामी ' - ज्याँ ल्यूक गोदार लुमिएर बंधूंनी जेव्हा कॅमेराचा शोध लावला तेव्हाच सिनेमातल्या वास्तववादाचा शोधही लावला असं म्हंटलं तर चूक ठरणार नाही. आपल्या छोट्याशा चित्रफितींमधून त्यांनी जे दाखवलं, ते त्यांच्या आजूबाजूला जे घडतंय त्याचच प्रतिबिंब होतं. पण हा वास्तववाद थोडा अपघातीच म्हणावा लागेल. चित्रपट हा तेव्हा एक प्रयोग होता, हौस होती. लुमिएर बंधूंची खात्रीच होती की हे माध्यम काही टिकणार नाही, त्यामुळे कथनासाठी त्याचा वापर कसा करावा याची त्यांना कल्पनाच नव्हती. तसा विचारच त्यांनी केला नाही ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
चित्रपट रसास्वाद
, कला रसास्वाद
, व्यक्ती विशेष
, चित्रपट जगत