सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-1) चित्रपट- ग्लास
मनोज, किंवा एम नाईट श्यामलन हे नाव एकेकाळी फार कौतुकाने घेतलं जात असे. पहिल्या दोन चित्रपटांना फारसं यश मिळालं नसलं, तरी त्याच्या ‘द सिक्स्थ सेन्स (१९९९) चित्रपटाने अगदी इतिहासच घडवला आणि लवकरच हा तरुण दिग्दर्शक हिचकाॅक आणि स्पिलबर्ग या अतिशय यशस्वी दिग्दर्शकांच्या पंगतीला बसवला जाऊ लागला. त्याच्या पुढल्या काही चित्रपटांना,म्हणजे अनब्रेकेबल (२०००), साईन्स (२००२), द व्हिलेज (२००४) यांना सिक्स्थ सेन्स एवढं यश मिळालं नाही हे खरं, पण तरीही त्याची किर्ती टिकून राहिली. किंचित घसरुनही शाबूत राहिली. ( वैयक्तिक रीत्या मला साईन्स ही फिल्म सिक्स्थ सेन्स हून अधिक आवडते असं मी याआधी अनेकदा लिहिलो बोललो आहे.) २००६ च्या लेडी इन द वाॅटरने मात्र श्यामलनजवळपास ब्लॅकलिस्टच झाला. आता या सिनेमात काही विशेष दम नव्हता हे खरं, पण इतक्या शिव्या देण्याजोगं तरी त्यात काय होतं हे मला कळलं नाही. त्यानंतरच्या काळात त्याचे चित्रपट कमी अधिक चालले. त्याने लिहिलेला पण दिग्दर्शित न केलेला ‘डेव्हिल’(२०१०), आणि २०१६ चा ‘स्प्लिट’,हे या नंत रच्या काळातले, मला आवडलेले चित्रपट. यातल्या स्प्लिटने एक नवीगोष्ट काही केली. ती म्हणजे आपल्या अखेरच्या दृश्यात चित्रपटाला सोळा वर्ष जुन्या अनब्रेकेबलशी नेऊन जोडलं, आणि श्यामलनकडून चित्रत्रयीची अपेक्षा तयार झाली. स् ...इस्टरेलचं शेवटचं स्टेशन
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .