'वळू’चा जाणता कॅमेरामन / चित्रस्मृती


लेखक अभिनेता गिरीश कुलकर्णी हे एक खास रसायन आहे. कलावंतांचा इगो बाजूला ठेवून तो वावरत असतो त्यामुळे त्याच्या अभिनयातले बारकावे अधिक ठसठशीत होतात. कॅमेरामन सुधीर पलसाने यांच्यासोबत त्याने वळू, देऊळ, गाभ्रीचा पाऊस या चित्रपटांमध्ये काम केलं. पलसाने हे केवळ कॅमेरामन नसून ते दिग्दर्शकाच्या मनातलं दृष्य पडद्यावर साकारतात. पलसाने यांचं व्यक्तिमत्व आणि कामाची पद्धत या विषयी गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेला हा अतिशय मनस्वी असा लेख-

'वळू’चा जाणता कॅमेरामन

असं माझ्या लक्षात आलंय बरं का, की अनेकदा काही अप्रुप वाटावं अशा गोष्टी कोणत्याही विशेष कर्तृत्वामुळे नव्हे तर योगायोगानेच मला मिळाल्या आहेत. आणि मग, अशा गोष्टींमुळे मीच कर्तृत्ववान असल्याचा संभ्रमही लोकांमध्ये बळावलाय. सुधीर पलसाने या अवलिया कलाकाराशी झालेली ओळख, सहवास आणि एकत्र काम करण्याचा लाभ ह्या काही अप्रुपाच्या गोष्टी. चेहऱ्यावर मऊ रूळणारी दाढी, त्यात दिसेल न दिसेल असं मंद स्मित ’ See…अशी सुरवात असलेलं, ठाय लयीतलं बोलणं आणि भारून टाकणारी व्यक्तीमत्वातली शांतता. सुधीर पलसाने! तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याच्या बद्दल मलाच काय, कोणालाच फारसं काही माहिती नव्हतं. पण त्याला पाहता क्षणी एक हायसं वाटलं होतं. पूर्ण लांबीचा चित्रपट करायचं ठरवलं होतं आम्ही. कसं? ते माहिती नव्हतं आणि सुधीर आल्यावर ते मनोमन उमगलं की ’हा’ म्हणेल तसं…!  कारणं बरीच होती. त्याच्या व्यक्तीमत्वाची छाप तर होतीच पण तो अनुभवीही होता अन त्याचे हे अनुभवही अनवट होते.  हॉलीवूड ते ब ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , व्यक्ती विशेष , चित्रपट जगत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen