ठाकरे-- दिग्दर्शनीय प्रभावी मांडणी


सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-

ठाकरे-- दिग्दर्शनीय प्रभावी मांडणी

आपल्याकडचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चरित्रपट म्हणजे रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित 'गांधी '( १९८२) , पण तो तर विदेशी दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. मूळ इंग्रजी चित्रपट त्यासह हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाला.  तर आपल्याकडे चरित्रपटांची संकल्पना रुजायला बराच काळ जावा लागला. हे दशक यावे लागले.   'ठाकरे ' पडद्यावर येईपर्यंत असे चरित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झालेत हे वास्तव आहे. काही चरित्रपटांचा विचकाही झाला. उदाहरणार्थ अझर. अर्थात, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा चित्रपट म्हणजे चित्रपट मालिकाच निर्माण करावी लागेल इतका आणि असा त्यांचा दीर्घ आणि गुंतागुंतीचा  प्रवास आहे. सर्वप्रथम व्यंगचित्रकार आणि मग राजकारणाबरोबरच पत्रकारीता, व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक आणि कालांतराने दैनिक सामनाचे संपादक, चित्रपट आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते, सांस्कृतिक क्षेत्राचे भान, देश विदेशातील घटनांवर लक्ष असेच अशा असंख्य गोष्टी आणि त्यातही काही गोष्टींवरून वाद वगैरे सगळेच एका चित्रपटात सामावणे शक्यच नाही. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन यात १९६० ते १९९५ या काळातील 'ठाकरे ' यांचा प्रवास असेल हे स्पष्ट होत होतेच. मध्यवर्ती स ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen