दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील मल्लीनाथी-
महोत्सवातील चित्रपट, प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत..... तशी ही वस्तुस्थिती ( की दुखणे?) नवीन नाही, पण आता एकूणच चित्रपट महोत्सव आणि चित्रपट निर्मिती वाढल्याने त्याचे अस्तित्व वारंवार अधोरेखित होतेय. याच जानेवारी महिन्यात लहान मोठे असे मराठी चित्रपटाला प्राधान्य देणारे तीन महोत्सव पार पडले. पुणे शहरातील पिफचे हे सतरावे वर्ष होते, औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय चित्रपट अलिकडेच सुरु झालाय, पण लक्षवेधक आहे, अंबरनाथ चित्रपट महोत्सवही अलिकडचाच असून त्याला यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतून कमालीचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसे पाहिले तर, अलिकडे वर्षभर कोणता ना कोणता चित्रपट महोत्सव सुरुच असतो. अगदी आखाती देश, सिंगापूर असा विदेशातही मराठी चित्रपट महोत्सव सुरुच असतो. त्यात महोत्सव किती आणि इव्हेन्टस किती हा वादाचा मुद्दा आहे. ट्रॉफीजशिवाय एकही सिनेमावाला राहणार नाही, असे अशा महोत्सवाचे भन्नाट आणि भरभरून पिक आलेय. आपल्यासाठी महत्वाचे आहे ते या महोत्सवात दाखल होणारे, अगदी सकारात्मक चर्चा होणारे चित्रपट प्रदर्शित कधी होणार? राज्य आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या काळात सेन्सॉर संमत झालेले चित्रपट दाखल करुन घ्यावेत असा नियम आहे, त्यामुळे अनेकदा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांना पुरस्कार मिळतात. अगदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोर्ट, कासव, रिंगण यांच्याबाबत हेच झाले. हे प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याना पुरस्कार प्राप्त झाले आणि या मग या चि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .