नलिनी जयवंतचे लग्न आणि ज्वेलथीफचा सीक्वेल...


'सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, स्थूल व कृशहिन् वय चौदाची' अशी देखणी बायको हवी, हे अनादी कालापासून चालत आलेले आहे. नलिनी जयवंत अगदी  तशीच होती. पण तिच्या लग्नाची, सिनेमाची आणि यशाची गाथा प्रत्यक्ष चित्रपटाहूनही अधिक रंगतदार आहे.... फिल्म आर्काइव्हजमध्ये आज नलिनीच्या यशाचे रहस्य आणि चित्रस्मृतीमध्ये ज्वेलथीफच्या सीक्वेलची आठवण- तिचे लग्न मोडले आणि सिनेमाचा संसार फुलला... पूर्वीच्या काळात आपली भावी पत्नी कशी असावी याचे सुरेख वर्णन देवलांच्या "शारदा" या नाटकात पहायला मिळते.  'सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, स्थूल व कृशहिन् वय चौदाची' ही गेल्या शतकातील स्त्री सौंदर्याची व्याख्या होती.  हे वर्णन चपखलपणे शोभुन दिसेल अशी नलिनी जयवंत अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी नॅशनल स्टूडियोच्या "राधिका" चित्रपटाद्वारे पडद्यावर आली. नलिनी मुळची गिरगावातली, लॅमिंग्टन आणि त्रिभुवन रोडच्या कोपऱ्यावर ती रहात असे.  मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबातील तरुण मुलींनी सिनेमासारख्या बदनाम व्यवसायात काम करणे,  हे त्या काळी शिष्टसम्मत नव्हते. तरीही गिरगावातील चक्क पाच नलिनी काहीना काही कारणानी सिनेव्यवसायात होत्या, नलिनी तर्खड, नलिनी नागपुरकर, नलिनी बोरकर, नलिनी ढेरे व नलिनी गुप्ते आणि नंतरच्या काळात नलिनी सराफ ( सीमा) व नलिनी चोणकर यादेखील  आल्या. नलिनी जयवंत ही प्रार्थना समाजजवळील राममोहन राॅय  शाळेची १९३३ ते १९४० या काळातील विद्यार्थिनी! जेष्ठ रेडिओ आर्टिस्ट बाळ कुरतडकर त्या वेळच्या आठवणी सांगत असत . बाळसुद्धा राममोहनचे विद्यार्थी,  नलिनीला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen