सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-
धप्पा – पहायलाच हवा!
इराणमध्ये खोमेनी राजवटीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली तेव्हा तिथल्या सर्जनशील कलावंतानी लहान मुलांना चित्रपटाची मध्यवर्ती पात्रे बनवली. लहान मुलांच्या भावविश्वाचं चित्रण करता करता तिथल्या समाजातील विषमता, स्त्रियांचं दुय्यम स्थान, भ्रष्टाचार या विषयांना नकळतपणे अधोरेखित केलं. माजिद माजिदी, जाफर पनाही यांच्या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा लहान व पौगंडावस्थेतील मुलं असूनही हे चित्रपट बालिश झाले नाहीत.प्रौढ प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य या चित्रपटांमध्ये होतं. निपुण धर्माधिकारीचा धप्पा पाहताना इराणी चित्रपटांच्या परंपरेची आठवण येते. धप्पाची ट्रिटमेंट इराणी चित्रपटांसारखी नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या टिंग्या, एलिझाबेथ एकादशी या चित्रपटांवर इराणी चित्रपटांचा असलेला प्रभाव धप्पा वर नाही मात्र लहान मुलांची गोष्ट सांगता सांगता सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर टोकदार भाष्य करण्याची शैली यात मात्र बरचसं साधर्म्य आहे. धप्पाची गोष्ट पुण्यातील एका हाऊसिंग सोसायटी मध्ये घडते. इंग्रजी माध्यमात शिकणारी, उच्च मध्यमवर्गीय घरातील ही मुलं त्यांच्या वयाला साजेशा उचापती करतात. चेत्या, मिहिर, ऋत्विक, आदित्य, शारवी या बच्च ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .