कुणी थिएटर देताय का थिएटर.....


दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

कुणी थिएटर देताय का थिएटर.....

भाई चा पूर्वार्ध, ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘उरी’, त्या आधीचा ‘सिम्बा’, २५ जानेवारीला आलेले ठाकरे, मणिकर्णिका फेब्रुवारी महिन्यातही सिनेमागृहात ठाण मांडून असताना १ फेब्रुवारी रोजी चार मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मी पण सचिन, सर्व लाईन व्यस्त आहेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेता धप्पा आणि युथ ट्युब त्याच बरोबर काही हिंदी, तमीळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी असे जवळपास डझनभर सिनेमे प्रदर्शित झालेत. त्यामुळे थिएटर्स मिळणे मुश्किल झाले आणि शुक्रवारी वर्तमानपत्रात चित्रपटाच्या जाहिराती खाली झळकलेले थिएटर्स आणि त्याचे खेळ शनिवारी अचानक गायब झाले. वर्तमानपत्र वाचून थिएटरवर गेलेल्या प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली. बुक माय शो ह्या वेबसाईटवरून बुकींग करू पाहणाऱ्या प्रेक्षकांना ठराविक थिएटर्सवर बुकींग करताना अडचणी निर्माण झाल्या. एकूण काय तर, २४ तास आधी ॲडव्हान्स बुकिंग नाही झाली म्हणून थिएटर्स मालकांनी नियोजित खेळ रद्द करून, त्यातल्या त्यात चांगल्या चालणाऱ्या चित्रपटांचे खेळ लावले. मग ह्यात बळी गेला तो १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांचा! कारण, उरी, मणिकर्णिका आणि ठाकरे ह्यांना तिकीटबारीवर अजुनही प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. त्यामुळे चालो अथवा न चालो, किमान ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen