बॉम्बे'ने दिलेला विश्वास


मणिरत्मनच्या ‘बाँबे’ने मात्र मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटात प्रायोगिकतेच्या वाटा खुल्या केल्या. त्याचे दृश्यात्मक रूप बदलून टाकले. प्रत्येक दृश्य चौकटीला सौंदर्य बहाल करता येते याचा धडा दिला. प्रत्येक प्रसंग, घटना,संवादांमधून उकलून सांगण्याची गरज नसते हे शिकवले. श्रीकांत बोजेवार यांनी  या चित्रपटाचे इतिहासातील स्थान सांगताना केलेले विश्लेषण-

अंक - साप्ताहिक साधना ऑगस्ट २०१४

बॉम्बे'ने दिलेला विश्वास

वेगवेगळ्या बदलांचे इतिहास आपण वाचत असतो, पाहात असतो. त्या इतिहासाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कधीकाळी जे काही घडले, त्याचा लिहिणाऱ्या, सांगणाऱ्या व्यक्तीला जाणवलेला, समजलेला अर्थ ती आपल्याला सांगत असतो. त्या इतिहासाच्या इतर बाजू समजून घेण्याचे पर्याय आपल्याला प्रत्येकवेळी उपलब्ध असतातच असे नाही. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीला कलाटणी देणारा एक क्षण, एक चित्रपट आणि त्या चित्रपटाने घडवलेला इतिहास पाहण्याचे भाग्य लाभले ते ‘बाँम्बे’ या चित्रपटामुळे. इतिहासाचा अभ्यास करता करता, इतिहासाचा साक्षीदारच होण्याचा योग यावा हा केवढा सुदैवविलास? या इतिहासाची चाहुल ‘बाँबे’ च्या आधीच कशी लागली होती, त्याचे सूतोवाच केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मी लोकसत्तात नुकताच चित्रपटांची परीक्षणे (किंवा समीक्षणे) लिहू लागलो होतो, तेव्हाची गोष्ट. ‘रोझा’ नामक चित्रपटांचा प्रेस शो (पत्रकारांसाठी असलेला, छोट्या थिएटरमध्ये होणारा खास खेळ ) होता. त्याच्या निमंत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. jspalnitkar

      6 वर्षांपूर्वी

    ' बॉम्बे' वरचा लेख फारच सुरेख !! चित्रपट पाहताना काही जाणवलेले आणि बरेचसे न जाणवलेले अनेक angles बोजेवारांनी खूप छान विशद केले आहेत...चित्रपट analyze करण्याचं आणि त्यातली सगळी 'cineamatic सौन्दर्यस्थळं' जाणवण्याचं वय नसताना हा चित्रपट पाहिला होता...पण तेव्हाही काहीतरी वेगळं आणि परिणामकारक पाहिल्याचं जाणवलं होतं... हॅट्स ऑफ टू मणिरत्नम!! आता 'बॉम्बे' पुन्हा पहायलाच हवा ? अश्याच अजून दर्जेदार लेखांची वाट पाहतो आहे !! धन्यवाद!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen