सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-
द फकीर ऑफ व्हेनिस-- गोष्ट तशी चांगली
या दशकातील हिंदी चित्रपटातील अनेक बदलांमधील एक म्हणजे, त्याच्या नावांनी चौकट मोडलीय. ( अर्थात दर्जा कमी-जास्त होणे स्वाभाविक आहे) आणि त्याच वेळेस काही नावे त्या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करतात. आनंद सुरापूर दिग्दर्शित 'द फकीर ऑफ व्हेनिस ' या नावाने कुतूहल जागे झालेच, पण त्यात फरहान अख्तर आणि अन्नू कपूर एकत्र असल्याने चित्रपटात नेमके काय बरे असेल याचे कुतूहल वाढले. विशेषतः फरहान अख्तर उगाच एखादा चित्रपट स्वीकारत नाही, म्हणूनच तर या चित्रपटात नेमके काय बरे असेल याकडे लक्ष होते. याचे मध्यवर्ती कथासूत्र सांगायचे तर, चित्रपट निर्मितीसाठी विविध प्रकारचे लहान मोठे कलाकार आणि वस्तू यांची व्यवस्था करणाऱ्या आदि काॅन्ट्रॅक्टरला ( फरहान अख्तर) व्हेनिसच्या एका वेगळ्या कला प्रदर्शनासाठी एका साधुची गरज आहे. हा साधु तेथे मातीत स्वतःला गाडून घेऊन फक्त बाहेर नमस्कारापुरते हात ठेवेल. खूप शोधाशोध केल्यावर त्याला परिस्थितीने गांजलेला असा सत्तार अली ( अन्नू कपूर) सापडतो. व्हेनिसला गेल्यावर सुरुवातीला सर्व गोष्टी जुळून येतातही. अगदी सत्तारचे प्रचंड दारु पिणेही आदि सहन करतो. सत्तार हा कोणी अलौकिक साधुपुरुष आहे असा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .