लतादीदीचा त्रागा आणि विजय आनंदची दिलदारी...!


दर मंगळवारी सिनेमॅजिकवर  चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

 

लतादीदी ( पुन्हा पुनः) चिडतात/रागावतात.....

रागावणे हा मानवी स्वभावाचा सहज धर्म आहे. स्वभावच रागीट असणे आणि एकाद्या गोष्टीचा प्रतिक्रियात्मक राग येणे या पुन्हा भिन्न गोष्टी आहेत. लता मंगेशकर जेव्हा एकाद्या गोष्टीवर खरोखरच पुन्हा पुनः रागावतात तेव्हा त्यात गांभीर्य असते, कारण त्या उठसूठ कोणावरही/कशावरही/केव्हाही/कधीही रागावणार अशा नाही. विशेषतः कारकिर्दीच्या म्हणा वा वयाच्या म्हणा, या टप्प्यावर एखाद्या गोष्टीचा राग त्यांना पुन्हा येतो म्हटल्यावर ती फक्त 'ब्रेकिंग न्यूज ' राहत नाही, तर त्यांचा हा राग समजून घेऊन तो दूर करणे आवश्यक आहे. पण त्या ज्या गोष्टीवरुन सतत रागावत आहेत, त्याचवरुन इतरांनीही भारी रागवायलाच हवे. जुनी गाणी रिमिक्स स्वरूपात जन्माला येताना मूळ गाण्याच्या अगदी पटकथालेखकालाही खरं तर राग यायला हवा. पटकथा रचनातानाच त्यात गाण्याच्या जागा जन्माला येतात अथवा आणल्या जातात. गीत संगीत नृत्य ही तर आपली जगावेगळी आणि समाजभान असणारी चित्रपट संस्कृती आहे असे मानत चित्रपट निर्मिती- दिग्दर्शन करणारे असे व्ही. शांताराम, राज कपूर, गुरुदत्त , विजय आनंद अशांच्या चित्रपटातील एकेका गाण्याच्या जन्माच्या कळा आणि कथा ( कदाचित काही दंतकथाही) खूप रोचक व रंजक आहेत. गीतकार, संगीतकार, गायक, वादक, रेकाॅर्डिस्ट अशा अनेकांच्या प्रतिभा आणि मेहनतीतून जन्माला आलेले गाणे घ्यायचे, त्याचे रिमिक्स करायचे आणि आजच्या  कोणत्या तरी सुशोभित, डेकोरेटीव्ह चित्रचंद्रिकेवर चित्रीत करायचे याचा राग येणारच. लग जा गले ( वह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    खालील अभिप्राय ला संलग्न करा. नाहीतर लेखाचे शिर्षक दिसणार नाही याची काळजी घ्या

  2. arya

      6 वर्षांपूर्वी

    मी पुनश्च व दीर्घाचा सभासद आहे.त्यामुळे लेख वाचता येत नाही.सभासदत्व शुल्क व फाॅर्म भरण्यापूर्वी कोड विचारला जातो,जो माहीत नसतो. प्रत्येक नियतकालिकाचे शुल्क वेगवेगळे असते. त्यापेक्षा एकत्रित शुल्क आकारुन सर्व पर्यायातील लेख वाचता यावेत अशी सुविधा देता येईल का याचा विचार करा आल इन वन सभासदत्व द्या.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen