तुर्कस्तानी सिनेमा म्हणजे नूरी बिल्गे जेलानचा सिनेमा अशी ओळख गेल्या काही वर्षात झाली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तुर्कस्तानमधील राजकीय पुरस्कार मिळाले आहेत. तुर्कस्तानमधील राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख व्यक्तिरेखांच्या मानसिकतेचा वेध घेण्याच्या नूरी बिल्गे जेलानच्या शैलीचा अभिजीत रणदिवे यांनी घेतलेला हा आढावा जागतिक सिनेमामध्ये आताआतापर्यंत तुर्कस्तानला विशेष महत्त्व नव्हतं. खरं तर सर्वार्थानं युरोपच्या जवळ असलेल्या आणि साहित्यात तसंच दृश्यकलांमध्येही प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा असणाऱ्या ह्या देशामध्ये उत्तम सिनेमा व्हायला काहीच हरकत नव्हती. काही काळापूर्वी इराणी सिनेमानं जसं जगभरच्या रसिकांचं मन जिंकलं, तसं तुर्की सिनेमाला मात्र जमलं नव्हतं. यिल्माझ गुने ह्या दिग्दर्शकाला १९८२ मध्ये कान महोत्सवात सर्वाधिक प्रतिष्ठेचं ‘गोल्डन पाम’ मिळालं होतं खरं, पण त्याच्या राजकीय विचारांमुळे तेव्हा त्याला देशाबाहेर राहणं भाग पडलं होतं. त्यामुळे तुर्कस्तानमध्ये ह्या पारितोषिकानंतर काही वेगळी सिनेपरंपरा निर्माण झालेली दिसत नाही. सध्या मात्र तुर्कस्तानी सिनेमा जगभरच्या महोत्सवांत दिसतो आहे. त्यात अनेक दिग्दर्शक आहेत, पण एक नाव सर्वांहून वेगळं उठून दिसतं. किंबहुना, तुर्कस्तानी सिनेमा म्हणजे नूरी बिल्गे जेलानचा सिनेमा अशीच ओळख गेल्या काही काळात निर्माण झालेली आहे. पूर्ण लांबीचे केवळ सात चित्रपट जेलाननं दिग्दर्शित केले आहेत. त्यातल्या एकाला कान महोत्सवात ‘गोल्डन पाम’ मिळालेलं आहे, तर चारांना त्यासाठी नामांकनं होती; शिवाय, कानमध्येच त्याला दोनदा ज्यूरी पारितोषिक, दोनदा फिप्रेस्की पारि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .