आनंदी गोपाळ - प्रेरणादायी 


आनंदी गोपाळ - प्रेरणादायी  गणेश मतकरी  आनंदीबाई गोपाळराव जोशी हे नाव परिचित आहे, ते आपल्याकडल्या पहिल्या महिला डाॅक्टर म्हणून. पण एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या आणि जेमतेम एकवीस, बावीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कर्तुत्ववान स्त्रीची,आणि गोपाळराव जोशी या तिच्या पतीची ओळख मोठ्या प्रमाणात तयार झाली, ती श्री. ज. जोशी यांनी लिहिलेल्या  आनंदी गोपाळ या कादंबरीमधून.आनंदीबाईंनी वैद्यकशास्त्रात पदवी मिळवली असली, तरी त्यांना या क्षेत्रातकाम करण्याची संधी काही मिळाली नाही. असं असूनही ज्या काळात स्त्री शिक्षणच आपल्या समाजाला मान्य नव्हतं, फुले दांपत्याने स्त्रीयांसाठी शाळा सुरु केल्यावरही त्याला पुरेसा प्रतिसाद नव्हता, अशा काळासाठी एकास्त्रीने ही पदवी मिळवणं हे आश्चर्यकारक होतं. बाकी स्त्रियांना हा पल्ला गाठण्यासाठी प्रेरणा देणं, आणि पुरुषसत्ताक समाजात स्त्रीशिक्षणाबद्दल सहानुभूतीची भावना तयार करणं, त्यासाठी मान्यता मिळवणं, अशी दुहेरीकामगिरी आनंदीबाईंनी करुन दाखवली. समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ हा चित्रपट या कर्तबदार दांपत्याला प्रभावीपणे पडद्यावर आणण्याचं काम करतो. आनंदीबाई आणि गोपाळराव यांचं सहजीवन, म्हणजेच कथानकाचा प्रमुख भाग हा चरीत्र आणि कादंबरी यामुळे आपल्याला परिचित आहे. चित्रपट सुरु होतो तो नऊ  वर्षाच्या यमूसाठी तिच्याहून वीस वर्षांनी मोठ्या गोपाळरावांचं ( ललित प्रभाकर )  स्थळ सांगून येतं तिथपासून. पोस्टात कारकून असलेले गोपाळराव बिजवर, आणि तऱ्हेवाईक म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांची लग्नासाठी अट एकच असते, आणि ती म्हणजे मुलीची शिकायचीतयारी हवी. ती आहे असं कळताच लग्न होतं, आणि आता आनंदी हे नाव मिळालेल्या यमूचं शिक्षणही सुरु

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , स्त्री विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen