गली बाॅय.... धारावी एक व्यक्तिरेखा 


-  दिलीप ठाकूर
     'लक बाय चान्स ' ( २००९), 'जिंदगी मिलेगी ना दोबारा ' ( २०११), दिल धडकने दो ( २०१५) या चकाचक चित्रपटांमुळे दिग्दर्शका झोया अख्तर ही पेन्ट हाऊस क्लास अथवा उच्चभ्रू वर्गातील नातेसंबंधातील गोष्ट सांगणारी अशी प्रतिमा निर्माण झाल्याने तिच्या चित्रपटाचे नाव 'गली बाॅय ' असावे हा काहीसा आश्चर्याचा धक्का होता. जिंदगी मिले ना...ची मांडणी खूप हळूवार होती, म्हणूनच तर त्याही चकचकीतपणात त्यातील तीन मित्रांची  गोष्ट भिडते. 'गली बाॅय 'च्या पोस्टर आणि एकूणच पूर्वप्रसिध्दीतून वाटत होते, की एका अगदी सामान्य नायकाचा पाॅप गायक होईपर्यंतचा प्रवास यात पाह्यला मिळेल. साधारण अशा पध्दतीने कधी काळी 'डिस्को डान्सर ' ( मिथुन चक्रवर्ती) पाहिला. झोया अख्तरने असे कथासूत्र मांडले असेल तर थोडे आश्चर्यच होते. कदाचित, जावेद अख्तर यांचा सत्तरच्या दशकातील नायक तिच्या डोळ्यासमोर असू शकतो, असाही एक विचार मनात आला.
      पण चित्रपट जस जसा आकार घेत जातो, घडत जातो, तस तशी झोया अख्तरची पटकथेवरची ( त्यात तिच्या जोडीला रिमा कागदी आहे) आणि दिग्दर्शनातील पकड स्पष्ट होत जाते. धारावीतील मुराद ( रणवीर सिंह) या गरीब मुस्लिम युवकाच्या नकळतपणे जाणवलेल्या ध्येयाची आणि स्वप्नाची गोष्ट यात आहे. ती जितकी आणि जशी सरळ वाटते, तितकीच ती विलक्षण गुंतागुंताचीही आहे. आणि नेमके तेथेच झोया अख्तरचे कसब दिसतेय. जवळपा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen