दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील मल्लीनाथी-
... हार्ड है भाय !
७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी... हा आठवडा म्हणजे प्रेम-प्रेमिकांचा विविधांगांने प्रेम व्यक्त करण्याचा सप्ताह असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा काळ म्हणजे परिक्षेच्या तयारीला लागण्यापूर्वी रीफ्रेश होण्याचा काळ असल्याने, मराठी चित्रपटांना जरा जास्तच भरती आली. पण, ती जशी आली तशी ओसरलीही. त्यात सुक्याबरोबर ओलं ही जळतं, तसे काहीसे 'भाई'च्या उत्तरार्धाचे झाले. पूर्वार्धाची पुण्याई उत्तरार्धाला टिकवता आली नाही. ह्यात चित्रपटाच्या गुणात्मकतेचा दोष नव्हता तर इतक्या गर्दीत तो टिकला नाही, असं म्हणावं लागेल. आणि केवळ गर्दिच नव्हे तर 'भाई'च्याच प्रेक्षकवर्गाला भावेल असा नुकताच प्रदर्शित झालेला 'आनंदी गोपाळ' समोर दिसत असल्याने प्रेक्षकांनी उत्तरार्धा ऐवजी 'आनंदी गोपाळ' साठी बजेट राखून ठेवले असावे. असो. शेवटी तुम्ही कितीही जाहिरात करा, अथवा दवंडी पिटा. चित्रपट कोणता पाहावा हे मायबाप प्रेक्षकच ठरवतात. व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने मराठीत 'आनंदी गोपाळ' आणि हिंदीत 'गली बॉय' प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक मिळविणे अवघड
हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. -->
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
९१व्या ऑस्कर पुरस्काराचे भाकीत, विश्लेषण आणि थोडं काही!
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-02-19 06:00:00

वाचण्यासारखे अजून काही ...

घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 22 तासांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 3 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 4 दिवसांपूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’
अंजनवेलचं दीपगृह
प्रा. सुहास बारटक्के | 6 दिवसांपूर्वी
इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो.
छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास
शं.गो.चट्टे | 2 आठवड्या पूर्वी
आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.
साहित्य : गजांआडचे
मीना वैशंपायन | 2 आठवड्या पूर्वी
कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते.