चित्रपटावर सेन्सॉर असावे की नसावे ? / चित्रस्मृती


१९५२ पूर्वी भारतातील प्रत्येक राज्याचे सेन्सॉर बोर्ड चित्रपटांसाठी वेगळे असे. एका राज्यानें संमत केलेला चित्रपट दुसऱ्या राज्यात नापास केला जाईल. पण ही ब्रिटीशनिती होती. १९५२ साली केंद्र सरकारने सिनेमाटोग्राफ अँक्ट संमत करून चित्रपट सेन्सॉर करायचे अधिकार केंद्राकडे घेतले. तेव्हापासून त्यांत सुसूत्रता आली. सेन्सॉर बोर्डाच्या कारभाराचा जेष्ठ पत्रकार सुधीर नांदगावकर यांनी घेतलेला लोखाजोखा..

चित्रपटावर सेन्सॉर असावे की नसावे ?

- सुधीर नांदगांवकर प्रकाशनपूर्व चित्रपट सेन्सॉर करण्यासाठी क़ेंद्र सरकारचे जे सेन्सॉर बोर्ड (आता त्याचे नांव बोर्ड ऑफ सर्टिफिशन असे ठेवण्यात आले आहे) आहे. त्याच्या अध्यक्षपदी नृत्यविशारद लीला सॅम्पसन यांची नियुक्ती करण्यात आल्यावर श्रीमती सॅमसन यांनी मुंबईत सेन्सॉरबोर्ड संबंधात एक परिसंवाद आयोजित केला होता. सेन्सॉर संबंधीचा कायदा १९५२ सालचा आहे. त्यांत थोडीफार सुधारणा जनता राजवटीत १९७८ मधे करण्यांत आली आणि त्यानुसार `अे' म्हणजे प्रौढांसाठी व `यू' म्हणजे सर्वांसाठी असे सर्टिफिकेट देण्याचे प्रकार होते. त्यात वाढ करून `अेयू' म्हणजे आईवडिलांना वाटले तर `अे' सर्टिफिकेट असलेला सिनेमा ते आपल्या मुलांना दाखवू शकतात. त्याचबरोबर `एस' म्हणजे स्पेशल कॅटगिरी सर्टिफिकेट देण्यात येऊ लागले. म्हणजे एखादे ऑपरेशन चित्रीत केलेले असेल तर तो चित्रपट डॉक्टरांच्या समुहाला पहाण्यास परवानगी मिळते. हा `एस' सर्टिफिकेटचा अर्थ. पण या सुधारणा झाल्यातरी मूळ १९५२ चा कायदा विस्ताराने लागू आहेच. १९५२ साली देशातली साक्षरता जेमतेम २५ टक्के सुद्धा नव्हती. आता हे प्रमाण सरसकट ७५ ते ८० टक्क्यावर पोचले आहे. तसेच १९५२ नंतर गेल्या ५० वर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट जगत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.