डोंबिवली रिटर्न/ कुंबलांगी नाईट्स्


लेखक महेंद्र तेरेदेसाई यांनी एक ‘सायकॉलिजीकल थ्रीलर’ म्हणून या चित्रपटाची चांगली मांडणी केली आहे. पूर्वार्धात तर त्यांच्यातील लेखक-दिग्दर्शक चांगलाच खुलला आहे. वेलणकराचं सत्शील व्यक्तिमत्त्व आणि एका छायाचित्राच्या निमित्तानं त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाला आव्हान देणारे प्रसंग पूर्वार्धात खूपच छान पद्धतीनं येतात. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतो.

मराठी चित्रपटसृष्टीच्या अलीकडच्या काळातील बदलांचं सर्वाधिक क्रेडिट ‘श्वास’ चित्रपटाला दिलं जात असलं तरी त्यापाठोपाठ लगेचच आलेल्या काही चित्रपटांचंही तेवढंच मोलाचं योगदान होतं. त्यापैकी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे २००५ मधील ‘डोंबिवली फास्ट’. या चित्रपटानं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला होता. या चित्रपटाचा शेवट ज्या पद्धतीनं झाला होता, तो पाहता त्याच्या ‘सिक्वेल’ला कुठेच जागा नव्हती. त्यामुळेच ‘डोंबिवली रीटर्न’ची घोषणा झाल्यानंतर जी गोष्ट संपली होती, ती पुढं कशी जाणार? याबद्दल सर्वांनाच कुतूहल होतं. २०१४ मध्ये खरं तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. तो मुळात हिंदी-मराठीत बनला. त्यानंतर काही कारणांनी रखडला आणि आता मराठीत तो प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा नायक जरी नागपूरच्या बाजूचा असला तरी चित्रपटामधील काही हिंदी संवाद कानी पडल्यानंतर या चित्रपटाचं ‘द्वैभाषिक’ कनेक्शन सहज लक्षात येतं. चित्रपटाच्या शीर्षकामधील ‘डोंबिवली’ शब्द आणि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संदीप कुलकर्णी या दोन गोष्टींचा अपवाद वगळल्यास ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘डोंबिवली रीटर्न’ या दोन चित्रपटांमध्ये तसं काहीच साम्य नाही. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen