९१व्या ऑस्कर पुरस्काराचा निकाल!/ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी...


दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

९१व्या ऑस्कर पुरस्काराचा निकाल!

९१व्या ऑस्कर सोहळा अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडत सापडत अखेर संपन्न झाला! सूत्रधार नसण्यामुळे सोहळा एरवीपेक्षा पटकन संपुष्टात आला. तर कोण कोण कोणत्या विभागात जिंकलं ते आपण पाहू! सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या मुख्य विभागात अपेक्षेप्रमाणेच रामी मॅलेक ‘बोहेमियन रॅप्सोडी’ या चारित्र्यपटासाठी जिंकला तर स्त्री विभागात ऑलेव्हिया कोलमन या ब्रिटीश अभिनेत्रीने ‘दि फेवरिट’ या सिनेमातल्या अभिनयासाठी अधिक ‘फेवरिट’ असलेल्या ग्लेन क्लोजला नमवलं. सहाय्यक विभागांत माहर्शला अली (ग्रीन बुक) आणि रेजिना किंग (इफ बिल स्ट्रीट कुड टॉक) या कृष्णवर्णीय अभिनेत्यांनी बाजी मारली. ‘रोमा’ ला नमवत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ‘ग्रीन बुक’! मात्र सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट छायांकन आणि सर्वोत्कृष्ट पारिभाषिक चित्रपट हे पुरस्कार ‘रोमा’ साठी अल्फोन्सो क्वारोन याने पटकावून ऑस्कर वर ‘रोमा’ चित्रपटाची छाप सोडली आहे. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा ऑस्कर जिंकला ‘ग्रीन बुक’ ने तर सर्वोत्कृष्ट रुपांतरीत पटकथेचा ऑस्कर अपेक्षेप्रमाणे ‘ब्लॅकक्लॅन्समन’ ला देण्यात आला. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रासंगिक , चित्रपट जगत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.