ऑस्कर २०१९ - चुकलेले आणि हुकलेले / चित्रस्मृती


ऑस्कर २०१९ आणि रोमा

२०१५ आणि २०१६ साली ऑस्करमध्ये कलावंतांच्या  २० नामांकनात  एकाही कृष्णवर्णीय व्यक्तीचं नाव चमकलं नाही  आणि इतर नामांकनांमधेही महत्वाच्या कृष्णवर्णीयांना वगळण्यात आलं.  २०१५ मधेआलेल्या ‘क्रीड’ आणि ‘स्ट्रेट  आउट्टा  कॉम्प्टन’ या कृष्णवर्णीयांचा प्राधान्याने समावेश असलेल्या चित्रपटांना सर्व मुख्य पुरस्कारांमधे अनेक नामांकनं होती. पण ऑस्करने यांना प्रत्येकी एकेक  नामांकन दिलं, तेही कृष्णवर्णीयांना वगळून केवळ  गोऱ्यांना. ‘बीस्ट्स ऑफ नो नेशन’  मधला अभिनेता इड्रीस अल्बा याला स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड आणि इन्डीपेन्डन्ट स्पिरीट अवाॅर्ड्स ने पुरस्कार दिले आणि गोल्डन ग्लोबसह अनेक ठिकाणी त्याला नामांकनं होती. पण ऑस्करमधे त्यालाही वगळलं. या सगळ्यामुळे कृष्णवर्णीय  कलावंतांमधे संतापाची लाट आली आणि अनेक  कृष्णवर्णीय तसच गोऱ्या कलावंतांनी या अन्यायाविरुद्ध तत्काळ काहीतरी होण्याची गरज  असल्याचं बोलून दाखवलं.  ‘ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स  ॲन्ड सायन्सेस’  या ऑस्करच्या  पालकसंस्थेनेही लगेच हालचाली सुरु केल्या आणि पुढल्या वर्षीपासूनच  धोरणात बदल दिसून आला. २०१७ मधे कृष्वर्णीयांच्या समस्यांभोवती फिरणाऱ्या ‘मूनलाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ( आधारीत) पटकथा  आणि मेहेरशाला  अलीला सहाय्यक भूमिकेचा, असे पुरस्कार मिळाले, आणि जल्लोषाचं वातावरण पसरलं. गंमतीची गोष्ट अशी, की त्यानंतर दोनच वर्षांनी जेव्हावर्णभेदाची कथा सांगणाऱ्या ‘ग्रीन बुक’लाही जवळपास हेच पुरस्कार , म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट,( स्वतंत्र ) पटकथा आणि मेहेरशाला अलीला सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार मिळाला, तेव्हा  या चित्रपटाच्या विरोधात मात्र अने ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen