सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर-
सोनचिडिया --- तेच डाकू, तोच संघर्ष
या चित्रपटाचे पोस्टर पाहूनच हा डाकूपट आहे हे वेगळे सांगायची गरज नव्हती. हिंदी चित्रपटाला डाकूपट नवीन नाही, त्यात मसालेदार सूडकथाच जास्त ( उदा. मेरा गाव मेरा देश, शोले, पत्थर और पायल, चट्टानसिंग, आखरी डाकू, आखरी गोली, चंबल की कसम, चंबल की रानी असे अनेक, जोरदार संवाद आणि गीत संगीत व नृत्य यांची फोडणी ही या डाकूपटाची वैशिष्ट्ये). काही डाकूपट खरंच वेगळे होते. राज कपूरचा 'जिस देश मे गंगा बहती है ', मोनी भट्टाचार्यचा 'मुझे जीने दो ', बासू भट्टाचार्य यांचा 'डाकू ', शेखर कपूरचा 'बॅन्डीक्ट क्वीन ' यांची याबाबत खास नावे घेता येतील. विशेषतः बॅन्डीक्ट क्वीन वास्तववादी असल्याने तो जास्त प्रभावी ठरला. फूलनदेवीच्या संघर्ष आणि साम्राज्य यावर तो होता. 'सोनचिडिया 'देखिल चंबल खोरे आपल्यासमोर घेऊन येतो. सत्तरच्या दशकात तेथील डाकूंची दहशत, त्यांची अघोषित अघोरी सत्ता, पोलिसांचे हे सामाजिक वास्तव खतम करण्याचा प्रयत्न, त्यांच्या दडपशाहीशी डाकूंचा सामना आणि त्यातून नवीन डाकू जन्माला येणे हे दुष्टचक्र आहे. १९७४- ७५ सालची गोष्ट यात आहे. डाकू मानसिंगचा दहशतवाद ( मनोज वाजपेयी) आणि करारी पोलीस अधिकारी गुज्जर ( आशुतोष ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .