दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील मल्लीनाथी-
टाईम आया.... -मयुर अडकर एका मागोमाग एक भरमसाट येणाऱ्या चित्रपटांमुळे काही सशक्त कथानक आणि उत्तम सादरीकरण असलेले चित्रपट भरडले जातात. असे जरी चित्र असले, तरी एखाद्या देश ढवळून काढणाऱ्या घटनेचाही चित्रपटांच्या व्यवसायावर भयंकर परिणाम होतो. हे ह्या आठवड्यात दिसून आले. पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने केलेला प्रतिहल्ला आणि भारत-पाकीस्तान सीमेवरील तणाव, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका, देशभरात जारी केलेला हाय अलर्ट आणि त्यासंबंधीच्या बातम्या ह्या सर्व प्रकारामुळे देशवासियांमध्ये देशप्रेम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने साहजिकच चित्रपटगृहासारख्या गर्दिच्या ठिकाणी जाणे टाळणे प्रेक्षकांनी पसंत केलेले दिसते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटांचे प्रमोशन झाकले गेले आणि परिणामी बॉक्स ऑफीसवर शुकशुकाट पाहायला मिळाला. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात चित्रपटगृहांकडे प्रेक्षक वळत नाहीत. त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्यात एक प्रकारचा धोका असतो. हे माहित असूनही चित्रपट प्रदर्शित होतातच. कारण पाऊस हा बेभरवशाचा असल्याने निर्माते आणि वितरक नेहमीच ती रिस्क घ्यायला तयार असतात. तसे गणेशोत्सवात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते तयार नसतात. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असले तरी मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाची धूम फारच मोठ्या प्रमाणात असल्याने, त्यात घरोघरी गणपती पुजले जात असल्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .