शेक्सपिअरची सिने-रूपांतराने एखादा अपवाद वगळता लोकप्रिय का झाली नाहीत याचे भाषा हे महत्त्वाचे कारण आहे. नाटकाची मूळ भाषा तशीच चित्रपटात ठेवली तर आजच्या प्रेक्षकाला ती कळणे अशक्य. जर ती बदलून आधुनिक रूप दिले तर तिच्यातील काव्य हरवते !‘हॅम्लेट’ची सिने-रूपांतरणे’
- विजय पाडळकर शेक्सपिअरला इंग्रजी भाषेतील सर्वश्रेष्ठ लेखक आणि जगातील असामान्य नाटककारापैकी एक मानले जाते, व ते योग्यच आहे. सर्वसामान्य सुशिक्षित वाचकाला त्याचे किमान नाव तरी माहीत असते आणि तो मोठा नाटककार मानला जातो हे देखील ठाऊक असते. जगातील बहुतेक भाषांत त्याची नाटके अनुवादित झालेली आहेत आणि त्यांचे प्रयोगही विविध देशांतील रंगभूमीवर, वेगवेगळ्या शैलीत सतत होत असतात. श्रेष्ठता आणि लोकप्रियता यांचा अद्भुत संगम झालेला हा नाटककार आहे. त्याच्या नाटकांचा प्रभाव वाचकांवर किंवा प्रेक्षकांवरच पडला आहे असे नव्हे तर लेखक, तत्वचिंतक आणि कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंतांनाही त्याची मोहिनी पडलेली आहे. गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या नाटकांचा अर्थ लावण्याची समीक्षकांची, अभ्यासकांची धडपड चालू आहे. अनेक आधुनिक नाटककारांनी त्याचे ऋण मान्य केलेले आहे आणि अनेक चित्रपट दिग्दर्शकांवर देखील त्याचा प्रभाव पडला आहे. जागतिक चित्रपटांच्या क्षेत्रात त्याचे एक खास स्थान आहे. त्याच्या नाटकांवर आजवर, जगातील विविध भाषांत सुमारे चारशेहून अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा शेक्सपिअरच्या साहित्यकृतींच्या चित्रपटीकरणाची ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीअप्रतिम..... अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख.. खूपच नवीन माहिती मिळाली. वाचून समाधान झाले. BTY “हेम्लेट” फारच खटकले बुवा!! कदाचित टंकलेखनाची चूक असू शकेल. HAMLET चा उच्चार “हॅम्लेट” असा असावा असे वाटते.