सेक्रेड गेम्स मधले पोलिस सॉलिड भयानक दिसतात, वागतात. कदाचित पोलीस खातंही या मालिकेवर खटला भरेल आणि पोलिसांची प्रतीमा डागाळली जातेय असा आरोप केला जाईल.
सेक्रेड गेम्स’ चा सांस्कृतिक धक्का
- निळू दामले सेक्रेड गेम्स ही मुंबईतील गुन्हे जगावर आधारलेली मालिका नेटफ्लिक्सवर रुजू झालीय. विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर ती बेतलेली आहे. पहिल्या मालिकेचे आठ भाग प्रसारीत झाले आहेत. भारतात आणि परदेशात ही मालिका खूप पाहिली जातेय, चर्चेत आहे. जगभरच्या पेपरांनी या मालिकेची दखल घेतलीय. मुंबईत सेक्रेड गेम्सच्या महाकाय जाहिरातीत सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी या प्रमुख नटांची चित्रं दिसतात. माध्यमं या मालिकेनं भयचकित झाली आहेत. क्वचित ठिकाणी मालिकेवर टीका झालीय. कथानकात आहे मुंबईतलं गुन्हे जगत आणि राजकारण. गुन्हेगार पुढाऱ्यांना मदत करतात आणि पुढारी गुन्हेगारांना मदत करतात. पोलिस मध्यस्थ असतात. हे वास्तव वेळोवेळी जनतेला समजलं आहे. कथा कादंबऱ्या, चित्रपट यातून हे कथानक वेळोवेळी नागरिकांनी पाहिलं आहे. सेक्रेड गेम्समधे कथानकाच्या हिशोबात नवीन असं काहीच नाही. तरीही सेक्रेड गेम्स पाहिली जातेय याचं कारण ती सर्वसामान्य देशी चित्रपटांपेक्षा अधिक बोल्ड आहे. त्यात सेक्सची भरमार आहे, संभोगदृश्यं आहेत. संभोगदृश्यात भारतीय स्त्री पुरुष दिसतात. आजवर संभोगात फक्त परदेशी माणसं भाग घेताना दिसत. भारतीय पात्रांनी घेतलेलं एकादं चुंबनही पडद्यावर दिसलं की प्रेक्षक चवताळत. इथं तर धडधडीत आणि दणादण संभोगदृश्यं, बराच काळ चालणारी, संख्येनंही बरीच. परदेशी प्रेक्षक खेचून घेण्यासाठी ही आयडिया वापरली गेलीय अन्यथा इ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .