भूतकाळातल्या मुंबईला वर्तमान काळात शोधणारा अवकाशप्रधान ‘फोटोग्राफ’!


अनेक छोट्यामोठ्या जिवंत मानवी संवेदनांबद्दल. आणि या सगळ्यातून प्रेक्षक म्हणून आपल्याला मिळणाऱ्या भावनिक अनुभवाबद्दल. एक फोटोग्राफ जसा एका क्षणापुरताच असतो, तसाच हा सिनेमा क्षणाक्षणांपुरता प्रत्येक तुकड्यातुकड्यात घ्यायचा अनुभव आहे.

भूतकाळातल्या मुंबईला वर्तमान काळात शोधणारा अवकाशप्रधान ‘फोटोग्राफ’!

-    अभय साळवी रितेश बत्राचा हा एकूण चौथा सिनेमा. आणि मुंबईवर आधारित असलेला दुसरा. म्हटलं तर आधीचा ‘लंचबॉक्स’ आणि आताचा ‘फोटोग्राफ’ दोन्ही सिनेमे प्रेम कहाण्या आहेत. पण दोन्ही सिनेमे पारंपारिक नायक-नायिका, त्यांचं प्रेमात पडणं, प्रेमात अडथळे येणं आणि अखेर त्यांचं प्रेम जिंकणं या कुठल्याच ठरलेल्या ठोकताळ्यांभोवती बनलेले नाहीत. मात्र हे पारंपारिक ठोकताळे मोडून नायक-नायिकेच्या अवतीभवती असलेल्या अवकाशाशी दोघांचे नाते हे सिनेमे जोडू पाहतात. दोन्ही सिनेमांमध्ये मुंबई हे शहर स्वतःच एक पात्र आहे! फोटोग्राफ मधून दिसणारी मुंबई आजच्या प्रत्यक्षातल्या मुंबईपेक्षा वेगळी आहे. फोटोग्राफमध्ये एखादा क्षण कायमचा कैद होऊन जिवंत राहतो तशीच काहीशी मुंबई इथे कैद झाली आहे. मात्र भूतकाळ हा लांब दूर कुठेतरी संग्रहालयात धूळ खात पडलेला काळ म्हणून इथे येत नाही. इथे भूतकाळ हा वर्तमानातंच जिवंत आहे. हे फार गतीवन शहर असलं, तरी याच शहरात एका वेगळ्या गतीने आयुष्य जगणारी माणसं आजही अस्तित्वात आहेत. हीच सर्व पात्र एकमेकांशी जोडून रितेश बत्रा आपल्याला त्याच्या मनातली मुंबई दाखवतो! गोष्ट प्रत्येक सिनेमात असते, त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen