जागतिक स्तरावर नावाजला गेलेला आणखी एक चित्रपट, ‘मर्द को दर्द नहीं होता’देखील प्रदर्शनास सज्ज झालेला आहे. तर, त्यासोबत अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेला ‘केसरी’देखील याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.‘केसरी’ पेक्षा ‘मर्द को दर्द नही होता’ बद्दल उत्सुकता
- अक्षय शेलार या आठवड्यात प्रदर्शित होणारे बहुतांशी चित्रपट एकतर त्यातील कलाकारांभोवती किंवा प्रत्यक्ष त्या कलाकृतीभोवती निर्माण झालेल्या वलयामुळे आकर्षणाचे केंद्र ठरणारे आहेत. गेल्याच आठवड्यात समीक्षक आणि प्रेक्षकांनी गौरवलेला ‘फोटोग्राफ’ प्रदर्शित झाला असतानाच जागतिक स्तरावर नावाजला गेलेला आणखी एक चित्रपट, ‘मर्द को दर्द नहीं होता’देखील प्रदर्शनास सज्ज झालेला आहे. तर, त्यासोबत अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेला ‘केसरी’देखील याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. समोर अक्षय कुमारचा चित्रपट असल्याने मराठी आणि हिंदीतही याहून वेगळे मेजर रिलीजेस नसले तरी मराठीत सूर सपाटा आणि सावट नामक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. याखेरीज प्रितीश चक्रवर्ती अभिनित आणि दिग्दर्शित चित्रपट ‘मंगल हो’देखील प्रदर्शित होण्याचे संकेत असले तरी तो प्रदर्शित होईल याची खात्री नाही. या चित्रपटात संजय मिश्रा, अन्नू कपूर या प्रसिद्ध हिंदी कलाकारांच्या भूमिका आहेत. तर इंग्रजीत दीडेक आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेला मार्व्हल स्टुडिओजचा ‘कॅप्टन मार्व्हल’ अजूनही चांगली कामगिरी करत असल्याने ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .