८० आणि ९० च्या दशकात प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गला फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन अत्यंत आवश्यक असल्याची खात्री पटली. जॉज हा जगभर अत्यंत गाजलेला आणि अनेकांनी नावाजलेला चित्रपट बनवून, सुमारे १५ वर्षे उलटून गेल्यानंतर, स्पीलबर्गला लक्षात आलं की, या सिनेमाची मूळ प्रिंट अत्यंत वाईट अवस्थेत असून ती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. ८०-९० च्या दशकांत जुन्या फिल्मस् नाश पावू लागल्या होत्या.फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्व्हेशन
कुठलाही देश त्याचा सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. बरीचशी संग्रहालये, विविध वस्तू, प्राचीन काळचे पोशाख, चित्रे, शिलालेख, चलनी नाणी, नोटा, स्टफ करून ठेवलेले प्राणी इत्यादी गोष्टींनी सुसज्ज असतात. पूर्वजांनी बांधलेल्या, उत्कृष्ट अभियांत्रिकी, स्थापत्यकला, वास्तुकला आणि त्या काळच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या उत्तुंग इमारती, महाल, गड-किल्ले आपण परंपरागत जतन करतो आणि त्याविषयी मनात प्रेम बाळगतो. सिनेमा हादेखील आपल्या प्राचीन आणि वैभवशाली संस्कृतीचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. कुठल्याही जुन्या वस्तू, पुस्तक, चित्र अथवा इमारतीप्रमाणे सिनेमादेखील जतन करणं गरजेचं आहे. अठराव्या शतकाच्या शेवटी किंवा एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला, काही विदेशी संग्रहालये, व्यक्ती अथवा संस्थांना जुने सिनेमे जतन करून ठेवण्याची संकल्पना सुचली. लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, न्यूयॉर्क येथील मॉडर्न आर्ट म्युझिअम , अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट या संस्थांनी या कार्यात पुढाकार घेतला. १९७०च्या आसपास मेट्रो गोल्डविन मेयर (MGM) या प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती संस्थेने या कार्यास सु ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वी“त्यांनी पटकथा लेखकाना ग्लॅमर आणले” हा दिलीप ठाकूर यांचा लेख मस्तच.. या लेखासंदर्भात एक सांगावेसे वाटते की..... कोमल नाहाटा यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी सांगितले होते की जंजीर चित्रपट रिलीज झाला त्यावेळी, त्यांनी व सलीम यांनी “ कथा,पटकथा आणि संवाद.. सलीम जावेद” अशी स्टिकर तयार करून जंजीरच्या पोस्टरवर चिकटवण्याचे उद्योग केले होते..