केसरी : अनावश्यक बाबींना थारा देणारा 


भारतीय प्रेक्षक पडद्यावरील देशभक्तीकडे आकर्षित होणारा असतो हे दत्तांना पक्के ठाऊक. त्यामुळेच त्यांचा कुठलाही सिनेमा या पलीकडे जात नाही. याचा फायदा सिनेमा यशस्वी होण्यात होतो. नुकसान मात्र दोन बाबतीत होतं. पहिला, युद्धपट कसे असावेत याचा वस्तुपाठ हे सिनेमे घालून देत नाहीत. तर दुसरा, प्रेक्षकांना ज्ञानी करण्याचं काम ते करत नाहीत. वास्तव न दाखवल्यामुळे दिसणारं कथानक हाच खरा इतिहास आहे हा भ्रम त्यांच्या मनात पक्का होत जातो.

केसरी : अनावश्यक बाबींना थारा देणारा 

- विवेक कुलकर्णी ऐतिहासिक घटना ह्या नेहमीच सर्वसामन्यांना आकर्षित करणाऱ्या असतात. त्याचं एक कारण त्या एका हाताच्या अंतरावर असतात त्यामुळे त्यात सुरक्षितता असते. घडलेली घटना हृदयद्रावक असली तरी प्रत्यक्ष तिच्यात आपला सहभाग कमीच असल्यामुळे आपण ती सुरक्षित अंतरावरून बघू शकतो. त्यावर चर्चा करता येऊ शकतो. कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर असा न्यायनिवाडा करता येतो. व्यक्तिशः आपली त्यात कसलीही हानी झालेली नसते. पण घटनेबद्दल आत्मीयता असते. ती आत्मीयता सिनेमा बघताना जास्त वाढते कारण सिनेमात एक तर त्या घटनेचं वास्तववादी चित्रण असतं किंवा अतिशयोक्ती तरी. ‘केसरी’ हा सिनेमा अतिशयोक्ती या वर्गात मोडणारा आहे. १२ सप्टेंबर १८९७ च्या दोन दिवस आधी हवालदार ईशर सिंगने (अक्षय कुमार) ३६ शीख रेजिमेंटच्या सारागढी किल्ल्याची आर्मी पोस्ट सांभाळलेली असते. त्याच्यासाठी ती एक शिक्षा असते. कारण तिथे फक्त २१ च सैनिक असतात. कारण त्याने आपल्या अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Harshad

      4 वर्षांपूर्वी

    एका उत्तम सिनेमाकडे फारच एकांगी नजरेने बघत घेतलेला वेध.

  2. asmitaphadke

      6 वर्षांपूर्वी

    the well written review. Now I will not waste my time & money. thanks !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen