देर ना हो जाए कहीं .../ हेमा मालिनीला जीवनगौरव पुरस्कार


हेमा मालिनीला  आघाडीचे तात्कालिक पीआरओ बनी रुबेन यांनी 'ड्रीम गर्ल ' अशी दिलेली उपाधी हेमा मालिनीच्या प्रेझेंटेबल व्यक्तीमत्वाला  अशी आणि इतकी फिट्ट बसली की, तीच कायमची ओळख झाली. आणि त्या प्रतिमेतूनच हेमा मालिनीच्या करियरने आकार घेतला. देर ना हो जाए कहीं ... - मयुर अडकर वितरकाने सांगितल्याप्रमाणे थिएटर्स न दिल्याने संतापलेल्या निर्मात्यांनी वितरकाला भर रस्त्यात चोप दिल्याची घटना अलिकडेच पुण्यात घडली. प्रकरण इतक्यावरच न थांबता, त्यांनी त्या मारहाणीचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडियो समाजमाध्यमांवर झळकवला. चित्रपट निर्मितीसाठी घरदार गहाण टाकून पैसा उभा केला, वितरण-प्रसिद्धीवर काही प्रमाणात पैसे खर्च केले पण अमुक एका खर्चात अमुक इतके थिएटर्स मिळवून देतो आणि तो व्यवहार सर्वात जास्त फायद्याचा वाटल्याने वितरकाला तेवढे पैसे दिल्यानंतर अपेक्षित किंवा वचन दिल्याप्रमाणे थिएटर्स न मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर नुकसान झाल्याने वितरकांवर हल्ला केल्याचे त्या व्हिडियोत दिसत होते. ह्या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद व्हायला हवी, असे व्हिडीयो पाहणाऱ्या चित्रपट सृष्टीतील लोकांचे म्हणणे आहे. परंतु प्रकरण कायद्याच्या दरबारात जाण्याऐवजी राजकीय संघटनेकडे गेले आणि निवळले. ह्या संपूर्ण प्रकरणात चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशाचे खापर फुटणाऱ्या वितरक वर्गाला अद्दल घडल्याचे चित्र असले तरी चित्रपट निर्मात्याचे अज्ञानही दिसून आले. मुळात चित्रपट ही एक कला आहे. त्यात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून निर्मिती करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना ह्या संपूर्ण व्यवसायाचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. केवळ विषय आवडला, कथा आवडली आणि खिशात मुबलक पैसा उभा करायचा अशा वृत्तीने ९९ टक्के अपयश आण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.