...आणि राजा हरिश्चंद्र पुण्यात पोचला / चित्रस्मृती


आपल्या पिताजींची स्मृती जागविली जाणार हे ऐकून नीलकंठ सुखावले. आणि त्यांनी `राजा हरिश्चंद्र'ची रीळे द्यायचे कबूल केले. त्यासाठी अटी घातल्या. पहिली अट नॅशनल फिल्म अर्काइव्हच्या संचालकांनी माझ्या घरी येऊन रीळे घेऊन जावीत. १६ एम.एम.ची प्रिंट फाळके कुटुंबियांसाठी मोफत द्यावी इ. सर्व अटी मी मान्य केल्या.
...आणि राजा हरिश्चंद्र पुण्यात पोचला
- सुधीर नांदगांवकर भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळक्यांचे जन्म शताब्दी वर्ष. १९७० होते. इंग्रजी वृत्तपत्रांनी त्याची दखल सर्वप्रथम घेतली. आणि कलकत्त्यांतून भारतीय सिनेमाचे जनक फाळके नसून हिरालाल सेन आहेत असा जाहीर प्रतिवाद करण्यात आला. हा प्रतिवाद ऐकून मी चकीतच झालो. तेव्हा फाळक्यांची जन्म शताब्दी 'प्रभात चित्र मंडळा'तर्फे साजरी करायची असे आम्ही ठरविले. प्रभात चित्र मंडळ स्थापन होऊन अवघी दोन वर्षे झाली होती. आमची सोसायटी छोटी होती. पैसेही नव्हते. पण कलकत्त्याचा दावा हाणून पाडायचा ही जिद्द  होती. ज्येष्ठ नट दिग्दर्शक गजानन जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती स्थापन केली. ही बातमी आम्ही वृत्तपत्रांत दिली नव्हती. पण मराठी चित्रपट व्यवसायात ती पोचलीच. ती ऐकून प्रभात फिल्म कंपनीचे तुकाराम, ज्ञानेश्वर इ. सिनेमाचे लेखक शिवराम वाशीकर यांचे चिरंजीव रत्नाकर वाशीकर मला भेटायला आले. त्यांनी आनंदाची बातमी दिली की फाळक्यांचे चिरंजीव नीलकंठ फाळके यांच्याकडे `राजा हरिश्चंद्र'ची रीळे आहेत. नीलकंठ इंडो-जर्मन असोशीएशनमधे ट्रान्स्लेटर म्हणून नोकरी करत होते. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    उत्तमोत्तम सिनेमा सभासदांना पाहाता यावेत म्हणून फिल्म सोसायटीच्या पदाधिका-यांनी सुरुवातीच्या काळात किती प्रचंड मेहनत घेतली होती, याचं हे एक उदाहरण आहे.. गेल्या १० वर्षात DVD आणि आता युट्युब मुळे सारं सोपं आणि सहज होवून गेलं. पहिल्या `हरिश्चंद्रा’ची प्रिंट व निगेटिव्ह जळून गेली. म्हणजे यूट्युबवर उपलब्ध असलेली दोन रिळे १९१७ सालची आहेत. हे ह्या लेखामुळे कळले.

  2. jspalnitkar

      6 वर्षांपूर्वी

    'हरिश्चंद्र' च्या लेखात 'भारतीय चित्रपटाच्या जनका' बद्दलचा कलकत्याचा दावा खोडून काढला गेला का आणि असल्यास कसा ह्याचा खुलासा नाही....कुतूहल आहे म्हणून विचारतोय...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen