लॉजिकली इनकरेक्ट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नेहमीच एक रिस्क घेत असतो. त्याचा प्रयत्न फसला तर तो सिनेमा टुकार म्हणून मोडित निघतो आणि जमुन आला तर त्याचा अंदाज अपना अपना होतो. वासन बाला ने दिग्दर्शित केलेला मर्द को दर्द नही होता हा सिनेमा अशाच जमून आलेल्या सिनेमांपैकी एक आहे. मर्द को दर्द नही होता – एक मॅड अनुभव लॉजिक बाजूला ठेवून मनोरंजन करुन घेण्याची सवय आपल्याला हिंदी चित्रपटांनी लावली आहे. हिंदी चित्रपट बघताना ‘असं कधी प्रत्यक्षात घडतं का? ‘ हा मनात आलेला प्रश्न प्रेक्षक म्हणून आपण झटकून देतो. सिनेमातल्या फॅण्टसीनं आपलं विश्व तीन तासापुरतं का होईना, फॅण्टास्टिक होऊन जातं. पडद्यावर दहा गुंडांना एक हाती लोळवणारा नायक आपला आदर्श बनून जातो व दुनियाकी दिवार तोडून सुखाने नांदणारे नायक-नायिका आपल्या स्वप्नांना बळ देतात. वास्तव आयुष्यात अनेकदा सिनेमातल्या या फॅण्टसी आपल्या आधाराला येतात. अशक्यप्राय घटना घडमार नाही हे माहिती असूनही क्षणभर का होईना हे मनातील मांडे आपल्याला रिलीफ देतात. लॉजिकली इनकरेक्ट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नेहमीच एक रिस्क घेत असतो. त्याचा प्रयत्न फसला तर तो सिनेमा टुकार म्हणून मोडित निघतो आणि जमुन आला तर त्याचा अंदाज अपना अपना होतो. वासन बाला ने दिग्दर्शित केलेला मर्द को दर्द नही होता हा सिनेमा अशाच जमून आलेल्या सिनेमांपैकी एक आहे. आधुनिक काळातील समांतर चित्रपट बनवणा-या अनुराग कश्यपच्या कंपूतील वासन बालाच्या नावावर लंच बॉक्स, रामन राघव 2.0, बॉम्बे वेल्वेट यासारखे चित्रपट आहेत. कथा लेखक, सहाय्यक दिग्दर्शक तर कधी अभिनेता म्हणून वासन बाला या चित्रपटांशी संबंधित आहे. हिंदी चित्रपटांची पारंपरिक चौकट मोडीत, काढणा-या या चित्रपटां ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीपण कॉजिनेन्टल टू इनसेन्सिटिव्हिटी म्हणजे सुपरह्युमन शक्ती नसून हा भयावह आजार आहे. साधी जखम होवून रक्त वाहू लागलं तरी अशा लोकांना त्याचा पत्ता नसतो.. रक्त वाहतंय हे कळलेच नाही तर रक्त थांबविण्यासाठी उपाय कसे करणार? पोटदुखी/डोकेदुखी काही कळतच नाही... हे सारे भयंकर आहे... त्यामुळे या आजाराने ग्रस्त लोकांची प्रचंड काळजी घ्यावी लागते. वेदना होणं हा त्रास नसून वरदान आहे हे ह्या आजाराविषयी माहिती झाल्याने जाणवले. बॉक्सर मंडळी किंवा कुंग फू/कराटे चा सराव करून शरीर कमावून मजबूत करणं ही गोष्ट वेगळी आहे... मार्वल कॉमीक्स मधील व्यक्तिरेखा देखील fantasy म्हणून स्वीकारल्या तर मनोरंजनच होते. चित्रपटाच्या परीक्षणावरून असे वाटते की हा आजार असल्याचा फायदा घेऊन नायक काही अचाट कामे करतो.. पण हा आजार आणि सुपर हिरो हे गणित काही पटण्यासारखे नाही... हा सिनेमा मी पाहिलेला नाही. कदाचित सिनेमात याचे उत्तर दिले असेल..