इफ दीज वॉल्स कुड टॉक- चित्रपट व अमेरिकेतील धार्मिक कट्टरता/ चित्रस्मृती


अमेरिका हा अतिशय व्यक्तीवादी देश आहे, मुक्त विचारांचे वारे तिथे वाहात असते, लैंगिक व्यवहाराबाबत तिथे मोकळीक आहे अशी प्रतिमा अनेकांच्या मनात असते आणि ती बव्हंशी खरी आहे. तथापि काही बाबतीत तिथे कट्टरता असते, गर्भपात विरोधी हिंसक चळवळी तिथे झाल्या याची फारशी माहिती नसते किंवा असलीच तरी पुसट माहिती असते. 'इफ दीज वॉल्स कुड टॉक' हा चित्रपट बघायला मिळाला आणि हा पैलू दिसला.   इफ दीज वॉल्स कुड टॉक- चित्रपट व अमेरिकेतील धार्मिक कट्टरता पाश्चात्य देश हे आधुनिक विचारसरणीचे असा समज सहसा असतो, पण धार्मिक बाबतीत तिथेही कट्टरता असते. आयर्लंड इथे स्त्रिच्या जीवाला थेट धोका असल्याशिवाय गर्भपात हा गुन्हा मानला जातो व ह्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. ह्या कायद्यात मे २०१८मध्ये बदल करण्यात आला असून त्यानुसार गर्भपाताला परवानगी दिली जाणार आहे, गुन्हेगारीचे कलम रद्द करण्यात येणार आहे.  ह्या नव्या कायद्याला सविताज लॉ नाव द्या अशी मागणी तिथे करण्यात येत आहे, याचे कारण सहा वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१२ मध्ये सविताचा गर्भपात नाकारल्याने झालेला मृत्यू. त्यातूनच पुढे सहा वर्षांनंतर का होईना आता बदल होत आहे. ही घटना अशी होती, सविता हलप्पनवार ही भारतीय वंशाची ३१ वर्षांची महिला आयर्लंड इथे रहात होती. गरोदरपणात गुंतागुंत झाली, १७ आठवड्यांचा गर्भ होता. स्पष्ट गुंतागुंत असूनही व सविताने विनंती करुनही हॉस्पिटलच्या मेडीकल टीमने गर्भपाताचा विचार करण्यास नकार दिला. सविताच्या जीवाला धोका आहे असे त्यांना वाटत नव्हते. कायद्याचा धाक खूप मोठा होता. स्त्रिच्या जीवाला धोका नसताना गर्भपात केला तर त्यांना शिक्षा होण्याची धास्ती.  ह्या चालढकलीत सविताचा मृत्यू झाला. यानंतर ह्या घ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen