स्थलांतर करुन येणारे,थोडा काळ सुखावणारे पक्षी आणि परदेशातून आलेला नातू यांच्यातले साम्य जाणवलेले आजी – आजोबा … रक्ताच्या नात्यांची ओढ आणि व्यवहारातील मर्यादा यात गुदमरणारे नाते संबंध … पुढच्या पिढीतही टिकून राहाणारी नात्याची घट्ट वीण आणि हे जाणवल्यावर मनाला मिळालेली उभारी --- नात्याचे आणि भावनांचे तरंग साधेपणाने पण अचूक टिपणारी फ्लेमिंगो ही मौज मध्ये आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची कथा वाचकांना एक उत्तम कथा वाचल्याचे समाधान नक्की देते. मोनिका गजेंद्रगडकर ---- मौज प्रकाशनगृहामध्ये मुख्य संपादिका म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या मोनिका गजेंद्रगडकर यांच्या लेखनाची सुरवात लोकसत्ता,लोकप्रभा,महाराष्ट्र टाइम्स इ.नियतकालिकांमधून केलेल्या मुक्त पत्रकारितेतून झाली.१९९५ पासूना सातत्याने कथा लेखन करणाऱ्या मोनिका गजेंद्रगडकर यांचे भूप,आर्त,शिल्प हे कथा संग्रह आणि उगम ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे.त्यांच्या विविध कथांचे अनुवाद कोकणी,इंग्रजी,हिंदी आणि गुजराथीमध्ये झाले आहेत.महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार,प्रियदर्शिनी अकादमीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार,विदर्भ साहित्य संघाच पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांच्या कथा लेखनाचा गौरव झाला आहे. मौज ---- पिढ्यान पिढ्या वाचकांना साहित्यिक खुराक पुरवणाऱ्या मराठी मासिकांमधील वजनदार नाव म्हणजे ‘मौज’.मौज दिवाळी अंकाला ९० वर्षांची परंपरा आहे. केवळ सकस, दर्जेदार साहित्यच प्रकाशित ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Shubhada
6 वर्षांपूर्वीफार हृदयस्पर्शी.. वाचताना अनेकदा डोळे भरून आले...
[email protected]
6 वर्षांपूर्वीफार छान ! स्वानुभूतिचा प्रत्यय आला. नगरकर राममोहन, पुणे