`ऋतुचक्र’ ते ‘व्यासपर्व’ आणि लोककथांपासून ते जातककथांपर्यंत असा दीर्घ अवकाश असलेल्या आणि आपल्या ठाम वैचारिक भूमिकेसाठी,निडर अभिव्यक्तीसाठी प्रसिध्द असलेल्या लेखिका म्हणजे दुर्गा भागवत. महाभारताच्या भाष्यकार असलेल्या दुर्गाबाईंनी आणीबाणीत घेतलेल्या प्रखर आणि निर्भय भूमिकेमुळे रणरागिणी ही त्यांची प्रतिमा मराठी जनमानसावर कायमची कोरली गेली. दुर्गाबाईंच्या स्नेहाचा लाभ झालेल्या विनय हर्डीकरांना या व्यक्तिमत्वाचे उलगडलेले हे आणखी काही पैलू,साप्ताहिक साधनाच्या दिवाळी अंकातील ‘स्वाधीन विदुषीचे मनोज्ञ चिंतन’ या लेखामध्ये. विनय हर्डीकर --- पत्रकारितेपासून ते गिर्यारोहणापर्यंत आणि सामाजिक चळवळींपासून ते प्रकाशन संस्थांपर्यंत चौफेर वावर असणारे लेखक म्हणजे विनय हर्डीकर.पत्रकाराची शोधक नजर,सामाजिक भान आणि लेखक म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव या जोडीला मर्ढेकर – शेक्सपियरपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत अनेकविध विषयांचा अभ्यास यामुळे हर्डीकरांच्या लेखनाला बहुआयामी परिमाण प्राप्त होते विनय हर्डीकर यांचे 'जनांचा प्रवाहो चालिला' हे आणीबाणीवरील चिंतनशील लेखन त्या काळावर अधिकृत भाष्य करते. साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे ‘श्रद्धांजली’ (१९९७), बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांची चरित्रात्मक अंगाने समीक्षा करणारे ‘कारुण्योपनिषद’ (१९९९), राजकीय-सामाजिक लेखांचे ‘व ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
दुर्गा भागवत
, विनय हर्डीकर
, व्यक्तिरेखा
, साप्ताहिक साधना
, प्रस्तावना