सोव्हिएट रशियातील स्टॅलिनच्या जुलमी दडपशाहीमध्ये अनेक प्रतिभावंत भरडून निघाले.त्यातील एक म्हणजे ॲना अख्मातोव.या कवयत्रीच्या सगळया कुटुंबाचीच फरपट झाली.या वातावरणातच तिचा स्नेह जुळला इसाया बर्लिन या ब्रिटिश अधिकाऱ्याशी.ब्रिटिश अकादमीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इसायाना ॲनाच्या मनाची होरपळ जाणवत होती.म्हणूनच तिच्या मृत्युनंतर तब्बल चौदा वर्षांनी इसायाना तिच्याविषयी लिहावसं वाटलं,त्या स्मरणलेखाचे दिवाळी चंद्रकांतमध्ये आलेले, अरुण नेरुरकरांनी केलेले हे मराठी रुपांतर. अरुण नेरुरकर --- बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या अरूण नेरुरकरंचा इंग्रजी साहित्याचा व्यासंग आहे.कदंब,धनंजय,उत्तम अनुवाद,अमृत,वसा,हेमांगी इ.दिवाळी अंकांमधून नेरुरकर यांनी केलेले अभिजात इंग्रजी कथांचे मराठी अनुवाद प्रसिध्द झाले आहेत.२०१५ पासून सलग तीन वर्षे त्यांनी ललित मासिकामध्ये सदर लेखन केले आहे.‘शॅडोज इन द ग्लेन’ या कथा संग्रहाचा त्यांनी प्राजक्ताच्या सावल्या नावाने केलेला अनुवाद प्रसिध्द आहे.नेरुरकरांनी केलेले डॉ.विलास सारंग यांच्या साहित्याचे संकलन पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे.फ्रांझ काफ्काच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’चा अरूण नेरुरकरांनी अनुवाद केला आहे,तसेच ‘अंडरस्टँडिंग एन्व्हॉर्यनमेंट’ हे प्रश्नोत्तररुपी पुस्तक इंग्रजीत अनुवाद केले आहे. चंद्रकांत ---- काद ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
चंद्रकांत
, अरुण नेरुरकर
, रशिया
, व्यक्ती परिचय
, साहित्य
, टॉलस्टॉय