रानावनात भटकणारा माणूस आधी गुहेत स्थिरावला आणि मग त्याने दगड मातीचा निवारा बांधला,पुढे आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर आपलं जगणं अधीक सुखदायी,सोप आणि आरामदायी करण्याचे अनेक मार्ग त्याने शोधून काढले.पण या प्रवासात तो निसर्गापासून चांगलाच दूर आलाय.अशा वेळी आजही गुहेतलं आदिम जगणं खुशीनं स्विकारून नागर जीवनशैलीकडे पाठ फिरवलेल्या एका अनोख्या पण अस्सल निसर्गपुत्राची ही ओळख. अनिल साबळे यांनी ऋतुरंगच्या दिवाळी अंकातून करुन दिलेली. ‘ऋतुरंग’ ----- समाजभान आणि आत्मभान यांची सम साधत दरवर्षी विशिष्ट विषय घेऊन प्रकाशित होणारा दिवाळी अंक म्हणजे अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’. दरवर्षी एक विषय, एक संकल्पना घेऊन ऋतुरंग प्रकाशित केला जातो.गेल्या २५ वर्षांमध्ये या अंकाबरोबर लेखक म्हणून गिरिश कुबेर,अमृता सुभाष,फ्रान्सिस दिब्रेटो,यशवंतराव गडाख,अण्णा हजारे,शरद पवार,सुहास बहुलकर,उर्मिला पवार,कुमार केतकर,अंबरिश मिश्र असे सुमारे सहाशे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर जोडले गेले आहेत.ऋतुरंगचे वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत ऋतुरंगमधील साहित्याची सुमारे ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.यात ‘निवडक ऋतुरंग’ आणि ‘ऐवज’ अशा संपादनांचा जसा समावेश आहे त्याचप्रमाणे ‘नापास मुलांची गोष्ट’, ‘हाती ज्यांच्या शून्य होते’‘मद्य नव्हे, हे मंतरलेले पाणी’ यांचा समावेश आहे. २०१८ च्या ऋतुरंगची संकल्पना आहे ‘बीज अंकुरे अंकुरे ’ .या अंकामध्ये गिरिश कुबेर, मेघना गुलजार(शब्दांकन– ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ऋतुरंग
, व्यक्तिचित्र
, व्यक्ती परिचय
, अनिल साबळे
, दगडू माळी
VinitaYG
6 वर्षांपूर्वीअप्रतिम !! असे अनोखे आणि मुक्त जीवन कुणी स्वेच्छेने स्विकारलय ह्यावर विश्वास बसत नाही.... दगडुचे कौतुक आणि त्याची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद !!