हजारो वर्षांपूर्वी इतर जगापासून दूर, काहिशा एकाकी अवस्थेत एक मानवी संस्कृती उदयाला आली ,चांगली हजार वर्षे विकसित झाली, उत्तम रस्ते बांधण्यापासून ते आकाशातील ग्रह गोलांचे निरिक्षण करुन पंचांग करण्यापर्यंत आणि भव्य वास्तु उभारण्यापर्यंत प्रगत झालेली ही संस्कृती म्हणजे अमेरिका खंडातील माया संस्कृती. मात्र आज ह्या संस्कृतीच्या खुणा फक्त त्यांच्या दगडी बांधकामातून शिल्लक राहिल्या आहेत.का झालं असं? जी माणसंच शिल्लक नाहीत त्यांच्य़ा संस्कृतीबद्दल माया वाटू शकते का ? याचा अलिप्त आत्मियतेने वेध घेणारा मिलिंद बोकील यांचा मौज मधला लेख ‘माणसांनी हरवलेली माया” मिलिंद बोकील --- पुणे विद्यापिठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवणारे मिलिंद बोकील मराठी वाचकांना परिचीत आहेत ते आशयघन,मानवी नातेसंबंधांचे आणि बदलत्या जीवनशैलीचे पैलू आपल्या कथा,कादंबऱ्यांमधून उलगडणारे लेखक म्हणून.‘कातकरी – विकास की विस्थापन’ असा प्रबंध संशोधन करुन लिहीणारे बोकील नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन व उपजिवीका,आदिवासी व ग्रामीण समस्या,लैंगिगताविषयक समस्या,आपत्ती व्यवस्थापन या विषयांमध्ये काम करतात.शाळा,समुद्र,गवत्या,एकम,मार्ग या त्यांच्या कादंबऱ्या आणि उदकाचिया आर्ती,झेन गार्डन हे कथासंग्रह प्रसिध्द आहेत.तसेच गांधी,विनोबा आणि जयप्रकाश,गोष्ट मेंढा गावाची,साहित्य भाषा आणि समाज मार्ग, वाटा आणि मुक्काम,समुद्रापारचे समाज ही त्यांची अन्य पुस्तके प्रकाशित आहेत. मौज -- ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मौज
, मिलिंद बोकील
, संस्कृती
, माया संस्कृती
, मेक्सिको
, चिचेन इत्झा