मराठीत सहसा कुणी न हाताळलेला एक धम्माल प्रकार या कथेत वाचायला मिळतो.भा.रा.भागवतांचे मानस पुत्र बनेश उर्फ फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार या कथेत आधुनिक रुपात पाहायला मिळतात.सुपर फास्ट गतीने विचार करुन,त्यापेक्षाही फास्ट ॲक्शन घेऊन एक संभ्रमात टाकणारी केस कशी सोडवली जाते ते मुकेश माचकरांनी दक्षताच्या अंकामध्ये लिहिलेल्या ‘अ चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन’ या कथेत वाचण्यातच मजा आहे. मुकेश माचकर मुकेश माचकर यांनी केसरीमध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात करून महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक, चित्रपट समीक्षक, पुरवणी संपादक या मार्गाने सहसंपादक पदापर्यंत मजल मारली. प्रहार वर्तमानपत्राचे ते मुंबईचे निवासी संपादक होते आणि मी मराठी या दैनिकाचे संपादकपदही त्यांनी भूषविले आहे. बिगुल या मराठीतल्या पहिल्या मतपोर्टलचेही ते संचालक-संपादक होते. सध्या ते मुक्त पत्रकार म्हणून वर्तमानपत्रांसाठी, नियतकालिकांसाठी प्रामुख्याने वक्रोक्तिपूर्ण सदरलेखन करतात आणि वेब सिरीज, चित्रपट, लघुपट, ऑडिओ बुक्स आदींसाठीही लेखन करतात. इंद्रायणी साहित्य या प्रकाशनसंस्थेसाठी त्यांनी ‘आर. डी. बर्मन : जीवन संगीत’, ‘फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या पुस्तकांबरोबरच ‘तुमसा नहीं देखा’ या शम्मी कपूरच्या चरित्राचा अनुवाद केला आहे. दक्षता --- मराठीमध्ये रहस्य कथा,गुन्हेगारी कथा यांना वाहिलेली जी मोजकी मासिके आहेत त्य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .