खूपदा इतिहासाचे काही तुकडे गायब होतात. समाजाचा स्मृतिभ्रंशच तो. राजीव साने यांनी आपल्या ‘सुलटतपासणी’ मध्ये ‘डिलाइट’चा उल्लेख केला आणि एका कालखंडाच्या आठवणी उचंबळून आल्या. समाजाचे मन घडविताना विविध संस्था जसे काम करतात तशा काही अनौपचारिक सामाजिक प्रक्रियाही खूप काही करून जातात. महाराष्ट्रात तर ह्याबाबतची खूपच मोठी परंपरा होती. अशाच एका छोट्या काळतुकड्या विषयीच्या आठवणी अनिल शिदोरे यांनी कालनिर्णय सांस्कृतिकच्या दिवाळी अंकामध्ये ‘डिलाइट विद्यापीठ : विस्मृतीत गेलेला काळाचा तुकडा’ या लेखातून जागवल्या आहेत. अनिल शिदोरे ---- गेली चाळीस वर्षे सामाजिक क्षेत्रात आणि चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेणारे अनिल शिदोरे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.इंग्लंडमधील ‘ऑक्सफॅम’ या संस्थेमध्ये सामाजिक बदलाच्या अभ्यास करण्याच्या प्रकल्पावर त्यांनी रिसर्च असोसिएट म्हणून काम केले आहे. कालनिर्णय सांस्कृतिक ---- गेली पंचवीस वर्षे दिवाळीच्या आनंदात भर घालण्याचे काम ‘कालनिर्णय सांस्कृतिक’ दिवाळी अंक नित्य नेमाने करत आहे.या अंकाची सूत्रे प्रकाशक,संपादक म्हणून जयराज साळगावकर सांभाळतात.या वर्षीच्या कालनिर्णयच्या दिवाळी अंकात प्रवास,आंतरराष्ट्रीय,चळवळी,कला अशा विभागांमध्ये वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण आणि वाचनिय लेख वाचायला मिळतात.‘आता शांत न राहिलेली सायलेंट व्हॅ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कालनिर्णय
, अनिल शिदोरे
, पुणे
hpkher
6 वर्षांपूर्वीतो प्रबोधन काळ संपल्याला आता 30 35 वर्ष झाली, नुसत्या आठवणी उरल्या,