सिटी हिस्टोरियन, सिने अभ्यासक रफिक बगदादी यांच्यासोबत मुंबईतल्या रस्त्यावरून फिरत त्यांच्या शंभर वर्षे जुन्या खान बिल्डींगमधल्या, जुनी पोस्टर्स, सिलिंगपर्यंत पोचलेल्या पुस्तकांचे ढीग असलेल्या खोलीत गप्पा मारत इराण्याचा चहा पित साजरा झालेला एक दिवस. असंख्य किस्से-प्राचीन मुंबईचे मंटोपासून डेव्हिड ससून पर्यंत बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान माझगावच्या किल्ल्यापासून मरिन ड्राईव्हच्या आर्ट डेको पर्यंत ऐकत असताना रफिक बगदादी आणि मुंबईतले रस्ते यांचं अतूट नातं नेमकं काय हे समजून घेता आलं. त्यांच्यासोबत फिरताना अनुभवलेली त्यांच्या किस्से-कहाण्यांतून उलगडत गेलेली मुंबई ,शर्मिला फडके यांनी चौफेर समाचारमधील ‘रफिकची मुंबई’या लेखात जीवंत केली आहे. शर्मिला फडके व्यवसायाने लेखक आणि कला - अभ्यासक. भारतीय आधुनिक आणि समकालिन चित्रकलेचा इतिहास हा विशेष अभ्यासाचा विषय, त्या अनुषंगाने विविध मासिके, वर्तमानपत्रे यामध्ये नियमित लेख, सदर तसेच ब्लॉग लेखन सुरू असते. चिन्ह या कलावार्षिकामध्ये अनेक वर्षांपासून लेखन आणि संपादन सहाय्य काही कलाविषयक पुस्तकांचे लेखन, संशोधन चालू आहे. कथा लिहितात, ‘फोर सिझन्स’ ही कादंबरी प्रकाशीत. समकालीन तुर्की साहित्यिकांच्या पुस्तक मालिकेचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. प्रवास, पर्यावरण, शहरे आणि सिनेमा हे विशेष आवडीचे विषय आहेत. चौफेर समाचार -- मराठीतला पहिला चालता बोलता दिवाळी अंक म्हणून चौफे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मुंबई
, शर्मिला फडके
, चौफेर समाचार
, रफिक बगदादी
, मंटो
suudharak2002
5 वर्षांपूर्वीमस्त सफर घडवली आवडत्या मुंबईची
Nishikant
6 वर्षांपूर्वीस्मरणरंजक प्रवास!