नेवराला नदीकाठची खडान् खडा माहिती. छडी टाकून गळदोरीने बक्कळ मासे कुठं सापडतात. कोळी लोक फेकजाळी कुठं फेकतात. सांगडीवरचे भोई हातजाळी कुठं सोडतात. चढत्या-उतरत्या पातळीवर पाण्याला धार कुठं पजते. ओढ कुठं आहे. घोळ-भोवरे कुठं होतात याची बित्तंबात नेवराला असे. सारी नदीच त्याला तोंडपाठ. नदीला एखाद मगर आली किंवा वरून एखादे प्रेत वाहून आलं की, लगेच त्याला गावच्या पोलीस पाटलाला वर्दी द्यावी लागे. अशा वेळी सारं गांव नदीवर लोटे. नेवरा भोवती चर्चेचं कोंडाळं होई. मध्ये बरीच कांही वर्ष निघून गेली. गाव आणि परिसराचा कायापालट झाला. इतका बदल झाली की, खुप वर्षांनी येणारा एखादा चुकार पाहूणासुद्धा चक्रावून जाऊ लागला. रस्ते आणि शिवार चुकू लागला. गावी नदीवर बंधारा झाल्याने, सारा शिवार बागायती झालेला. ऊस-द्राक्षाची पिके. जोडधंदे आणि कारखानदारी वाढलेली. लोकांच्या हाती पैसा खेळू लागलेला. रस्त्यांचे जाळे विणले गेलेले. गावात पहिली कठु तरी बघून बघून सायकल दिसायची. तीथं आता घरटी वाहने दिसू लागलेली.याचा थेट परिणाम नेवरासारख्यांच्या धंद्यावर झालेला. नेवरा तर त्यात पारच कुचंबून गेलेला. लोक नावेचा मार्ग बदलून जावू लागल्याने, नेवरा लोकांच्या विस्मृतीतच गेला. कधीमधी काही कामानिमित्त मी वाडीला गेलोच, तर नदीकडे जाऊन नेवराची गाठभेट घेऊन येत असे. पुढे पुढे तेही कमी होत गेले. बऱ्यात दिवसांनी असाच एकदा वाडीला गेलो. नेवराला भेटलो. आपुलकीने त्याची सारी चौकशी केली. ख्याली-खुशाली विचरल्यावर त्यालाही खूप बरं वाटलं. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर सहजच त्याला म्हणालो, “मग! काय म्हणते नाव? बऱ्यापैकी होतो का रे धंदापाणी? त्यावर तो मोठ्या निराशेने म्हणाला, “त्यो कुठला वो! तुमच्या गावच्या बंधाऱ्यामुळं माझी निम्मीअर्धी गावं तुटली बघा.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Santoshkumar Ghorpade
4 वर्षांपूर्वीहृदयद्रावक व्यक्तिचित्रण
Santoshkumar Ghorpade
4 वर्षांपूर्वीहृदयद्रावक व्यक्तिचित्रण
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअगदी प्रातिनिधिक कथा आहे ही, विकास होतो त्याचबरोबर या गोष्टी घडतात. काळीज पिळवटून टाकणारी वाक्ये आहेत या कथेत.