कलाकाराला शापित आयुष्य का जगावे लागते ? प्रतिभावंतांचे प्राक्तन दुःखाच्या रंगानीच रंगवलेले असते का ? जगाच्या कल्पनेत नसलेली कला सादर करणाऱ्या कलाकाराने जगाची नियमांची चौकट सांभाळलीच पाहिजे का ? अलौकिक सर्जनशिलता लाभलेल्या कलाकाराच्या अपूर्ण आयुष्याचा वेध घेणारा सतीश भावसार यांचा जगप्रसिध्द चित्रकार व्हॅन गॉफ याच्या वैयक्तिक आयुष्याचा आढावा घेणारा ऋतुरंग मधील ‘शोधता शोधता … ’ हा लेख सतीश भावसार --- मुखपृष्ठकार,चित्रकार म्हणून ख्यातनाम असलेल्या सतीश भावसार यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून ॲप्लाइड आर्टचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी फिल्म ॲनिमेशन,कॅमेरामन हे कोर्स केले आहेत.दै.नवशक्ती मध्ये बारा वर्षे त्यांनी कलासमिक्षक आणि चित्रकार म्हणून काम पाहिले आहे.भावसार यांचा कुंचला जितक्यासहजपणे चालतो तशीच त्यांची लेखणीही चालते.सुपर्णा प्रकाशन,पुणेसाठी त्यांनी इंग्रजीतील क्लासिक अकरा कादंबऱ्यांचा अनुवाद केला आहे.सुमारे पाच हजार पुस्तकांची मुखपृष्ठे आणि त्यातील रेखाटने करणाऱ्या भावसार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात ‘श्यामची आई’ चे मुखपृष्ठ काढून केली,हे मुखपृष्ठ वडघर येथील साने गुरुजी स्मारकामध्ये पाहायला मिळते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीइर्विन्ग स्टोन चे लस्ट फॉर लाईफ जास्त वाचनीय आहे.. हा लेख कोरडी जंत्री आहे.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच नावीन्य पूरणी माहिती . यापूर्वी व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच अनुवाद - मंगला निरूडकर वाचलं होतं . वीस एक वर्षापूर्वी त्यानंतर या विषयावर चा आजचा लेख - छान .