दस्तंबू


‘अंदाज-ए-बयां और ’ म्हणून आपल्या अलग अंदाजासाठी आणि लाजवाब शायरीसाठी आजही ओळखला जाणारा आणि काव्यरसिकांना प्रिय असलेला शायर म्हणजे मिर्झा गालिब.१८ व्या शतकाच्या अखेर जन्मलेल्या या मनस्वी कवीने शायरीबरोबरच गद्य लेखनही केलं होतं,यात त्याने लिहिलेल्या रोजनिशीचं महत्व जास्त आहे कारण याच त्याच्या दैनंदिनीमधून १८५७ च्या क्रांतीयुध्दाचे दर्शन घडते आणि ते ही एका दिल्लीतील शायराच्या नजरेतून.या दैनंदिनीचे हे मराठी रूप राजन खान यांनी श्री व सौ च्या दिवाळी अंकासाठी साकारलेले – दस्तंबू   राजन खान --- गेली चार दशके सातत्याने मानवतावादी मुल्ये आणि सामाजिक भान याचे दर्शन घडवणारे ललित साहित्य लिहीणारे लेखक म्हणजे राजन खान. ‘हिलाल’,‘सत ना गत’ , ‘वळूबनातील कामधेनू;, ‘जातवन आणि विनशन’ , ‘ चिमूटभर रुढीबाज आभाळ’,‘ एक लेखक खर्च झाला’,‘गूढ;,‘आडवं आणि तिडवं’ अशा कादंबऱ्या आणि कथासंग्रहांमधून राजन खान यांनी नेहमी माणूसकी,करुणा,मानवी मनातील अनेकविध स्पंदने,नात्यांची गुंफण,व्यक्ती आणि समष्टीतील गुंतागुंत यावर प्रकाश टाकला आहे.ललित लेखनाबरोबर वैचारिक लेखन करुन एकूणच जगण्याच्या संघर्षातील धर्म,भावभावना,व्यवहार याचे पैलू उलगडण्यचा प्रयत्न ते करताना दिसतात.सोलापूरचा भैरु रतन दमाणी पुरस्कार,राज्य शासनाच उत्कृष्ट पटकथा लेखन पुरस्कार( चित्रपट – धुडगुस) यांनी त्यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे.‘अक्षर मानव’ ही संस्था सुरू करुन समाजात वैचारिक अभिसरण होण्यासाठी,मानवातावदी विचारधारा रुजण्यसाठी ते प्रयत्नशिल आहेत.२००३ साली सावंतवाडी येथे भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , अनुभव कथन , श्री व सौ

प्रतिक्रिया

  1. Devkate Sambhaji

      4 वर्षांपूर्वी

    Sundar lekh...

  2. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    वाह.. गालिबचे हे रूप माहीतच नव्हते... त्याकाळात गालिबची मानसिकता काय होती ह्याचा बोध झाला. मुळातच, गालिबने “दस्तंबू” लिहिले आहे, असे कुठेही वाचले नव्हते. यात गालिबने आपली प्रतिभा इंग्रजांची बाजू घेण्यासाठी वापरली आहे. १८५७ च्या उठावातील सैनिकांना शत्रू आणि इंग्रजांना विश्वविजेता म्हटले आहे. पण याचा काही उपयोग झाला नाही. उठावाचे वादळ शमल्यावर इंग्रजांनी गालिबचे सगळे मानसन्मान काढून घेतले.. पेन्शन मिळावे म्हणून गालिबने अनेक अर्जविनंत्या केल्या, कलकत्त्याला अनेक खेटे घातले. पण त्याला पेन्शन दिले नाही. (या बद्दल गालिब “बंडखोरांना” दोष देतो.)१५ फेब्रुवारी १८६९ ला गालिबचे निधन झाले. उठाव करणाऱ्या सैनिकांना गालिब लुटारू/विश्वासघातकी म्हणतो. नंतर इंग्रजांनी दिल्ली अक्षरश: बेचिराख केली, अनेकांची हत्या केली....(तेव्हा गालिब म्हणतो “पण विजेत्यांच्या विजयाच्या वेळी असं घडतंच.”) त्यात बादशहा बहादूर शहा जफर ने लिहिलेल्या गजल आणि त्याचा राजकवी इब्राहीम जौक च्या गजल, असे सगळे साहित्य जळून गेले. बादशहाला ब्रह्मदेशात पाठवून दिले. शेवटच्या दिवसात दिल्लीत मरण यावे म्हणून बादशहाने विंनती केली. पण ती इंग्रजांनी अमान्य केली. रंगून मध्येच त्याचे दफन झाले. श्री. राजन खान यांनी हा ऐतिहासिक दस्तावेज मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल, श्री व सौ दिवाळी अंक, यांनी छापल्याबद्दल आणि “बहुविध” ने पुनर्प्रकाशित केल्याबदल, मन:पूर्वक आभार.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen