साहसे श्री प्रतिवसती ! या सुभाषिताचं उदाहरण म्हणजे गद्रे मरिन्स ही रत्नागिरीच्या दिपक गद्रेंनी सुरू केलेली कंपनी.वर्तमानपत्रातल्या एका बातमीने त्यांचे कुतुहल चाळवले गेले आणि मत्स्य व्यवसायात शिरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.धाडसाला परिश्रमाची,चिकाटीची आणि दूरदृष्टीची जोड मिळाली की व्यावसायिक यशाची शिखरे सहज गाठता येतात हे गद्रे मरिन्सचा आजवरचा प्रवास पाहिला की लक्षात येते.महाराष्ट्र,कर्नाटक आणि गुजराथमध्ये कारखाने उभारुन जगभरात आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या गद्रे मरिन्सचा हा प्रेरणादायी प्रवासभानू काळे यांनी रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये या अंतर्नादमधील लेखात उलगडला आहे. भानू काळे ---- गेली दोन दशके चोखंदळ वाचकांच्या पसंतीला उतरलेल्या आणि एक वैचारिक भूमिका असलेल्या अंतर्नाद मासिकाचे संपादक म्हणून मराठी वाचकांना भानू काळे परिचित आहेत. राजकीय पार्श्वभूमीवरील ‘तिसरी चांदणी’ आणि कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवरील ‘कॉम्रेड’ या भानू काळेंच्या कादंबऱ्याचे मराठी साहित्यात स्वतःचे स्थान आह.विविध सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील‘अंतरीचे धावे’ हा लेख संग्रह,तसेच बदलणाऱ्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .