माणसं! मला दिसली तशी


आपल्या अवती भवती वावरणारी माणसे प्रत्यक्षात कशी असतात ? त्यातही ही माणसे जर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिध्द असतील,वलयांकित असतील तर त्यांची जनमानसात रुजलेली प्रतिमा आणि त्यांचे खरे व्यक्तिमत्व एकसारखेच असेल का ? मग मटका किंग म्हणून जगात (कु)प्रसिध्द असलेला माणूस प्रेमचंदच्या कौटुंबिक कादंबरीचा चाहता असू शकतो, खरचं माणसाची ओळख कशावरुन करायची,त्याच्या रुढ प्रतिमेवरुन का त्याच्या मनातल्या खऱ्या माणसावरुन? त्यातही जेवताना त्या त्या माणसाचे खरे रुप कळते या वचनावर विश्वास ठेवला तर जगभरातल्या हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केलेल्या श्रीरंग भागवतांना दिसलेली ही बहुरंगी बहुढंगी माणसं खरीच मानावी लागतील. दीपावलीच्या दिवाळी अंकातील माणसं ! मला दिसली तशी हा भागवतांचा लेख माणसांचे विविध रंग दाखवतो.       श्रीरंग भागवत मौज प्रकाशनाच्या भागवत परिवारात जन्म झालेले श्रीरंग भागवत व्यवसायाने शेफ आहेत. ३७-३८ वर्षांच्या व्यावसायिक आयुष्यात त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. या भटकंतीच्या दरम्यान त्यांचा देशपरदेशातील अनेक लोकांशी संबंध आला. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील, जाती-जमातीतील लोकांचा समावेश होता. त्यांनी ह्या विविध लो ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीपावली , अनुभव कथन , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. sanjay

      6 वर्षांपूर्वी

    रतन खत्री अनुभव लक्षणीय



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen