स्विडनमध्ये राहणारे बंगाली कुटुंब … टोपोब्रत,मोनोबेग अशी नावे… भारतातून व्यावसायिक कारणासाठी येणाऱ्या कंपनी प्रतिनिधीला चक्क पाच किलो वांगी आणायची विनंती … भारतीय कौटुंबिक परंपरा आणि पध्दती याचे गोडवे गाणारी स्विडीश महिला आणि स्विडनच्या रोखठोक,वैयक्तिक अवकाश जपणाऱ्या,कौटुंबिक गोंधळात न अडकणाऱ्या व्यवस्थेच्या प्रेमात पडलेली तीची बंगाली जाऊ … किस्त्रीमच्या दिवाळी अंकातील सेन आणि नॉनसेन्स या लेखामध्येमध्ये शरद वर्दे त्यांच्या खुसखुशित शैलीत एका काहिशा विक्षिप्त कुटुंबाचे दर्शन घडवतात. अंक - किस्त्रीम दिवाळी २०१८ शरद वर्दे शरद वर्दे यांनी संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविधांगी व्यवस्थापन केले. त्या निमित्ताने तीन दशकांहून अधिक काळ यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडांत सतत भ्रमण केले. विविध क्षेत्रातील विदेशी व्यावसायिकांना खूप जवळून निरखले. मान्यवर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.झुळूक अमेरिकन तोर्याची या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचा श्रीपादकृष्ण कोल्हटकर व आचार्य अत्रे राज्य पुरस्कार देऊन गौरवले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी प्रसिद्ध केलेली डॉ. शरद वर्दे यांची पुस्तके झुळूक अमेरिकन तोर्याची (चौथी आवृत्ती) फिरंगढंग (तिसरी आवृत्ती) राशा (दुसरी आवृत ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
kanchi_289
6 वर्षांपूर्वीसेन कोण आणि नॉनसेन कोण ? खरच ... मलाही हाच प्रश्न पडला कथा वाचल्यावर.