कलाकाराचं भागधेय अनेकदा कल्पनेहून अद्भूत असतं.खरतर कोणत्याही कलाकाराला त्याच्या कलाकृतींबद्दल जगाला काय वाटतंय हे जाणून घ्यायचं असतं,कदाचित त्याच्या कलाकृती लोकांना आवडणार ही नाहीत पण निदान काहीतरी प्रतिक्रिया कलाकारापर्यंत पोहचायला हवी,मात्र काही कलाकारांच्या कलाकृती त्यांच्या हयातीत रसिकांपर्यंत पोहोचतच नाहीत.विवियन मेयर ही छायाचित्रकार याचं उदाहरण म्हणता येईल.तिने काढलेली छायाचित्रे सुमारे सत्तर वर्षांनी आकस्मिकपणे कशी जगासमोर आली याची अनोखी कथा नितिन दादरावाला यांनी लिहिलेल्या ‘विवियन मेयरच्या शोधात’या अनुभवच्या दिवाळी अंकातील लेखात वाचायला मिळते. नितीन दादरावाला --- मुळात कवी असलेल्या दादरावालांनी रंगाच्या माध्यमातूनही कॅनव्हासवर कविताच लिहील्या.८०च्या दशकात शब्दांमध्ये रमणारे हे व्यक्तिमत्व मग रंगात खेळू लागले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले.चित्रकार गायतोंडेपासून ते दुर्गाबाई भागवत,अरुण कोलटकर,अरुण शहाणे,सतीश काळसेकर अशा संवेदनशील कलाकारांचा सहवास त्यांना तरुण वयात लाभला.स्वतः उत्तम छायाचित्रकार असलेल्या नितीन यांनी लिहिलेला ‘प्रतिमा प्रचिती’ हा ग्रंथ म्हणजे रसास्वादाचे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, अनुभव
, कला रसास्वाद
, व्यक्ती विशेष